Rain Alert : उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत असून मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Rain Alert) उत्तर प्रदेशमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. जोरदार वारे, पावसाच्या सरी आणि विजांच्या कडकडाटामुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत.याशिवाय १६ जनावरे दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (Rain Alert) अनेक ठिकाणी झाडे कोसळली, वीजपुरवठा खंडित झाला आणि घरांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करत प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. (Rain Alert) जखमींना योग्य उपचार मिळावेत यासाठी विशेष निर्देश देण्यात आले असून, नुकसानभरपाई २४ तासांत देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, बिहारमध्येही वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. (Rain Alert) Rain Alert : निसर्गाचा कोप! वीज कोसळल्याने २४ जणांचा मृत्यू; अवकाळी पावसाने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान बुधवारी संध्याकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत सुरू असलेल्या खराब हवामानामुळे किमान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पटना आणि बेतिया येथे मिळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर जहानाबादमध्ये घराची बाल्कनी कोसळल्याने चार जण जखमी झाले, तसेच बक्सरमध्ये ई-रिक्षावर झाड कोसळल्याने सहा जण जखमी झाले आहेत. (Rain Alert) भोजपूर जिल्ह्यातील महुली येथे जोरदार वादळामुळे तरंगता पूल तुटला, तर सुपौलमध्ये वीज पडल्याने झाडाला आग लागल्याची घटना घडली. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून हवामान खात्याने पुढील काही दिवसांतही अशाच परिस्थितीची शक्यता वर्तवली आहे. (Rain Alert) हेही वाचा : Cold Wave : महाराष्ट्रात थंडीची लाट; पुण्यासह अनेक जिल्ह्यांत IMD चा इशारा, पारा १० अंशांखाली Maharashtra Weather : राज्यात थंडीचा वारा नाही, पावसाचा घाला मात्र नक्की! IMD चा धक्कादायक अंदाज, वाचा…