HSC-SSC Exam : मोठी बातमी..! दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या पहिला पेपर कधी?
HSC-SSC Exam : हाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या संभाव्य तारखा अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत.

SSC HSC Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या SSC आणि HSC परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे. (HSC-SSC Exam)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. (HSC-SSC Exam)
बोर्डाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे तसेच परीक्षेचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. (HSC-SSC Exam)
बारावीचा पहिला पेपर ८ फेब्रुवारीला
महाराष्ट्र बोर्डाच्या माहितीनुसार, बारावीच्या (HSC) लेखी परीक्षा सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होणार असून मंगळवार, १६ मार्च २०२७ रोजी संपणार आहेत. तर बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. (HSC-SSC Exam)
दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
दहावीच्या (SSC) विद्यार्थ्यांसाठीही बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीच्या लेखी परीक्षा सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ रोजी सुरू होतील आणि गुरुवार, ११ मार्च २०२७ रोजी संपतील. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. (HSC-SSC Exam)
विषयानुसार सविस्तर वेळापत्रक कधी?
बोर्डाने सध्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन आणि लेखी परीक्षांचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. (HSC-SSC Exam)
त्यामुळे विद्यार्थ्यांनी सध्या जाहीर झालेल्या तारखांच्या आधारे अभ्यासाचे नियोजन करावे आणि विषयानुसार अंतिम वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्याची पुन्हा खात्री करावी. (HSC-SSC Exam)
परीक्षांच्या महत्त्वाच्या तारखा
परीक्षा प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन लेखी परीक्षा
बारावी (HSC) २० जानेवारी – ६ फेब्रुवारी २०२७ ८ फेब्रुवारी – १६ मार्च २०२७
दहावी (SSC) २८ जानेवारी – १३ फेब्रुवारी २०२७ १५ फेब्रुवारी – ११ मार्च २०२७
विद्यार्थ्यांनी विषयानुसार अंतिम वेळापत्रकासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.





