Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज कोसळून ५ जणांचा करुण अंत; ४ जण गंभीर जखमी
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Sambhajinagar News : जिल्ह्यात गुरुवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सिल्लोड येथील दहिगावात वीज पडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तसेच कन्नड तालुक्यातील पिशोर येथेही वीज पडण्याची दुर्घटना घडली. (Sambhajinagar News)
या घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून, दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील या दोन घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. (Sambhajinagar News)
दरम्यान, जालना शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, अनेक दिवसांच्या खंडानंतर दमदार पावसाचे आगमन झाले आहे. जालना तालुक्यासह अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. (Sambhajinagar News)
पावसाअभावी रानातील पीके करपू लागल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे आज झालेल्या या पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Sambhajinagar News)
Sambhajinagar News : महाराष्ट्र हळहळला ..! पोहायला गेलेल्या 4 तरुणांचा बुडून मृत्यू, परिसरात शोककळा





