Eknath Shinde : मोठी बातमी . .! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर आहेत.

Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर आहेत. (Eknath Shinde)
मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वडनगरहून अहमदाबादला जाण्यासाठी शिंदेंना रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागला. (Eknath Shinde)
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे वडनगर हेलिपॅडवर सुमारे ४५ मिनिटे हेलिकॉप्टरची प्रतीक्षा करत होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अखेर त्यांनी रस्ते मार्गाने अहमदाबादकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. (Eknath Shinde)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वडोदरा येथेही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. (Eknath Shinde)
या दौऱ्यात शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची एकत्रित उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. (Eknath Shinde)
Eknath Shinde : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शाहांची भेट; अर्धा तास चर्चा, मुंबईत काय घडलं?





