Voter List SIR : मोठी बातमी! 2 कोटींहून अधिक मतदारांची नावे प्रारुप यादीतून वगळली; तुमचं नाव आहे का तपासा
Voter List SIR : राज्यात राबवण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत प्रारुप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

SIR Voter List : महाराष्ट्रातील मतदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) 2026 अंतर्गत प्रारुप मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Voter List SIR)
या प्रक्रियेत तब्बल 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदारांचे Enumeration Forms उपलब्ध झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मतदारांची नावे सध्याच्या प्रारुप यादीत दिसत नाहीत. मात्र, याचा अर्थ संबंधित मतदारांची नावे कायमची मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत, असा होत नाही. (Voter List SIR)
9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 कोटी नावे प्रारुप यादीत
SIR प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 नोंदणीकृत मतदार होते. प्रारुप मतदार यादीत 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. (Voter List SIR)
यामुळे 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावे प्रारुप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. यामध्ये मतदार अनुपस्थित असणे, कायमस्वरूपी स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा Enumeration Form उपलब्ध न होणे अशा विविध कारणांचा समावेश आहे. (Voter List SIR)
तुमचं नाव यादीत नसेल तर काय करायचं?
प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाने 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी दिली आहे. या प्रक्रियेनंतर छाननी करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (Voter List SIR)
मतदारांनी नाव कसं तपासायचं?
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर SIR 2026 संदर्भातील प्रारुप मतदार यादी आणि ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले नाव तपासणे महत्त्वाचे आहे. (Voter List SIR)
मतदान केंद्रांमध्येही बदल
SIR प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. काही मतदान केंद्रे कमी करण्यात आली असून काही नवीन केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तसेच काही मतदान केंद्रांची ठिकाणे बदलण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांनी आपले नाव आणि मतदान केंद्र दोन्ही तपासून घेणे महत्त्वाचे आहे. (Voter List SIR)
SIR Process Maval: मावळातील ९२ हजार मतदारांचे काय होणार? एसआयआर प्रक्रियेनंतर मोठी खळबळ






