Earthquake News : भूकंपाच्या धक्क्याने महाराष्ट्र पुन्हा हादरला; एकाच दिवसात दोनदा हादरे, नागरिकांमध्ये भीती
Earthquake News : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Earthquake News : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवसात दुसऱ्यांदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पेठ तालुक्यातील चार गावांना या भूकंपाचा अनुभव आला. (Earthquake News)
पेठ तालुक्यात चार गावांना हादरे
मिळालेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील गोंदे, बोरवट, देवगाव आणि भयगाव या गावांमध्ये दुपारी सुमारे ४.५३ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि काही जणांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली. (Earthquake News)
सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Earthquake News)
पहाटेही जाणवले होते भूकंपाचे धक्के
याच दिवशी पहाटे नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाणा तालुक्याच्या काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले होते. मध्यरात्री सुमारे १२ वाजून ६ मिनिटांनी धक्के जाणवल्याने झोपेत असलेल्या नागरिकांमध्ये भीती पसरली. (Earthquake News)
आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसरात हे हादरे जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू निर्घुडपाडा असल्याचे सांगण्यात आले. (Earthquake News)
आठ दिवसांत तिसऱ्यांदा भूकंपाचे हादरे
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ८ ऑगस्ट रोजीही याच परिसरात भूकंपाचे हादरे जाणवले होते. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. (Earthquake News)
वारंवार जाणवणाऱ्या या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Earthquake News)
Colombia earthquake : कोलोंबियातील भूकंपातील मृतांची संख्या १३२ वर !





