Tehsildar Suspended : राज्यात खळबळ..! अमळनेरचे तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं
Tehsildar Suspended : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौणखनिज चोरीप्रकरणी महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Tehsildar Suspended : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौणखनिज चोरीच्या प्रकरणाने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गौणखनिज चोरी आणि अवैध वाहतुकीवर प्रभावी कारवाई करण्यात निष्क्रियता व बेजबाबदारपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Tehsildar Suspended)
महसूल आणि वन विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीनंतर आणखी एका तहसीलदारावर कारवाई प्रस्तावित असल्याची चर्चा असल्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Tehsildar Suspended)
सावखेड्यात मशीनद्वारे वाळू उपसा
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मे रोजी सावखेडा येथील वाळू घाटावर नियमबाह्य पद्धतीने मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले होते. महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. (Tehsildar Suspended)
गौणखनिज उत्खननाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. (Tehsildar Suspended)
मंडळाधिकारी आणि तलाठीलाही निलंबित केले
या प्रकरणात सावखेडा येथील मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. दोघांना तत्काळ निलंबित करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. (Tehsildar Suspended)
अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी चौकशी पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. (Tehsildar Suspended)
चौकशी अहवालानंतर तहसीलदारांवर कारवाई
प्रांताधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाच्या आधारे आता अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाने त्यासंदर्भातील आदेश काढले असून हे आदेश गुरुवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. (Tehsildar Suspended)
महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ
दरम्यान, या निलंबनाविरोधात महसूल अधिकारी संघटना सुराणा यांच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. सुराणा यांनी अवैध वाळू उपशाविरोधात केलेल्या कारवाईचे पुरावे उपलब्ध असून त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई एकतर्फी आणि अन्यायकारक असल्याचा दावा संघटनेने केला आहे. (Tehsildar Suspended)
सुराणा यांना सुनावणीची संधी देऊन त्यांचे निलंबन मागे घ्यावे आणि त्यांना अमळनेर येथे पुन्हा नियुक्त करावे, अशी मागणी महसूल अधिकारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महसूल विभागाच्या अपर सचिवांकडे केली आहे. (Tehsildar Suspended)
दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते का आणि तहसीलदार सुराणा यांचे निलंबन मागे घेतले जाते का, याकडे आता प्रशासनाचे लक्ष लागले आहे. (Tehsildar Suspended)





