Colombia earthquake : कोलोंबियातील भूकंपातील मृतांची संख्या १३२ वर !
भूगर्भात ११० किलोमीटर खोलीवर भूस्तरांमध्ये झालेल्या हालचालींमुळे हा भूकंप झाला असल्याचा प्राथमिक अंदाज यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने वर्तवला आहे.

Colombia earthquake – कोलोंबियामध्ये काल झालेल्या भीषण भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले असून या भूकंपातमरण पावणाऱ्यांची संख्या आता १३२ पर्यंत पोचली आहे.
भूकंपाचा सर्वाधिक फटका चोका भागातील सॅन जोस देल पामर भागाला बसला असून कॅली, मानिझालेस आणि पेरेइरा या शहरांमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे.
आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. इमारतींचे ढिगारे उपसले जात असल्याने मृतांचा हा आकडा यापेक्षाही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या भूकंपामुळे हजारो घरे एकतर पुर्णपणे कोसळली आहेत कींवा त्यांचे मोठे नुकसान तरी झाले आहे.
भूगर्भात ११० किलोमीटर खोलीवर भूस्तरांमध्ये झालेल्या हालचालींमुळे हा भूकंप झाला असल्याचा प्राथमिक अंदाज यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने वर्तवला आहे.
महिन्याभरापुर्वीच व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे किमान ५८ हजारांपेक्षा जास्त इमारतींचे नुकसान झाले होते. तर हजारो जणांचा बळी गेला होता. तेथील भूकंपाच्या कारणांचा आणि कोलोंबियाच्या भूकंपामागील कारणांचा परस्परांशी संबंध असावा, असे तज्ज्ञ सांगत आहेत.





