Maharashtra Rain : महाराष्ट्र ‘हाय अलर्ट’वर! ८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; पूर आढाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Maharashtra Rain : ८ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने राज्यातील यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला.

Maharashtra Rain : नाशिकमध्ये मंगळवारी ढगफुटीसदृश पावसाची शक्यता आहे. तसेच, ८ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने राज्यातील यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिला. (Maharashtra Rain)
राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि रस्त्यावर न येण्याचे आवाहन केले. (Maharashtra Rain)
फडणवीस यांनी सांगितले की, दरडी कोसळणे, नद्यांच्या वाढत्या पाणीपातळीचे व्यवस्थापन आणि बचावकार्य यांसारख्या आघाड्यांवर प्रशासन काम करत आहे. ८ जुलैपर्यंतच्या हवामान परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. उद्या नाशिकच्या काही भागांत ढगफुटीसदृश घटना घडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)
आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत आणि सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. अहमदाबाद-मुंबई द्रुतगती मार्गावरील काही भाग बांधकाम स्थळांवर पाणी साचल्यामुळे आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बंद केले आहेत. (Maharashtra Rain)
तसेच, पालघर जिल्ह्यात दिवसाच्या उत्तरार्धात येणाऱ्या भरतीमुळे आणि पाऊस पुन्हा सुरू झाल्यास पाणी साचण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते. पश्चिम घाट आणि रायगड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्रीसह प्रमुख नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहे. (Maharashtra Rain)
नद्यांची पाणीपातळी वाढत असल्याने प्रशासन सातारा आणि कोल्हापूर येथील परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवून आहे. पालघरमध्ये एका लहान धरणाचा काही भाग खराब झाल्यामुळे, धरणाच्या खालच्या प्रवाहातील गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. दिवसभरात हवामानाची ताजी माहिती आणि अंदाज यांचा आढावा घेतल्यानंतर शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. (Maharashtra Rain)
काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही फाईल बंद केली होती
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. कनेक्टिंग लिंक कोणतीही संरचनात्मक त्रुटी किंवा बिघाड झालेला नाही. वाहतुकीतील अडथळे हे लगतच्या टेकड्यांवरील दरडी कोसळल्यामुळे निर्माण झाले आहेत. (Maharashtra Rain)
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. २०१३ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा जोडणारा मार्ग का बांधता येणार नाही, याची १३ कारणे देऊन ती फाईल बंद केली होती, मात्र महायुती सरकारनेच निर्णय घेऊन हा प्रकल्प पूर्ण केला, असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Rain)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दरड कोसळण्याच्या घटना अभूतपूर्व आहे. जिथे यापूर्वी कधीही अशा घटना घडल्या नव्हत्या, अशा ठिकाणी सुमारे १०० टन राडारोडा पडला आहे. सुमारे ७० टन राडारोडा आधीच हटवण्यात आला असून पुण्याकडे जाणाऱ्या तीन मार्गिका (लेन्स) पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीHeavy Rainfall: खेड तालुक्यात मुसळधार पाऊस; चिंबळी, कुरुळी परिसराचा वीजपुरवठा पहाटेपासून खंडित
Mumbai Rain Update : पावसाचा अलर्ट! खासगी कंपन्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे






