Rain Alert : राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; पुढील काही तास महत्त्वाचे
Rain Alert : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Rain Alert : राज्यात उकाड्याचा प्रभाव कमी होत असताना हवामानात मोठा बदल जाणवत आहे. भारतीय हवामान विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Alert)
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वारे, विजा आणि काही ठिकाणी गारपीटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता असून नांदेड, हिंगोली, परभणी येथे हलक्या सरींचा अंदाज आहे. सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून कोल्हापूरमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. (Rain Alert)
कोकणात मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असून सिंधुदुर्गात हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांतही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain Alert)
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भात, मका आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Rain Alert)
हेही वाचा :
Pune Rain Updates : पुण्याला अवकाळीने झोडपले! विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी; पाहा काय आहे स्थिती





