IMD Rain Alert : देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभाग (IMD) ने विविध राज्यांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. ९ मेपर्यंत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक भागांत वादळी पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी ७० ते ८० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (IMD Rain Alert) या कालावधीत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, गारपीट आणि धुळीची वादळे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (IMD Rain Alert) दिल्ली-एनसीआरमध्ये अस्थिर हवामान दिल्ली-एनसीआर परिसरात ६ मेपर्यंत हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील, तर काही भागांत गारपीट होण्याचीही शक्यता आहे. (IMD Rain Alert) डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसासह उंच भागात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. या भागातही वाऱ्यांचा वेग ३०-५० किमी प्रतितास राहू शकतो. उत्तर भारतात वादळाचा धोका पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये ६ मेपर्यंत पावसाची शक्यता असून, ४ आणि ५ मे रोजी ७० किमी वेगाचे वादळ आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. उत्तर प्रदेशात ३ ते ७ मेदरम्यान वादळी वारे आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (IMD Rain Alert) राजस्थानात धुळीचे वादळ राजस्थानमध्ये ४ मे रोजी धुळीचे वादळ येण्याची शक्यता असून, ४ ते ८ मेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि वाऱ्यांचा वेग ३०-४० किमी प्रतितास राहणार आहे. (IMD Rain Alert) पूर्व आणि दक्षिण भारतातही पावसाचा जोर पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये आठवडाभर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातही पुढील पाच दिवस पावसासह वारे वाहतील. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातही पावसाचा जोर राहणार आहे. (IMD Rain Alert) दरम्यान, या बदलत्या हवामानामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. (IMD Rain Alert)