Ajit Pawar : महाराष्ट्र सुन्न!!! राजकारणात घड्याळामुळे मिळालेली ओळख घड्याळ्यावरच थांबली….
Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर्ड विमानाचे लँडिंगदरम्यान नियंत्रण सुटल्याने हे विमान थेट शेतात कोसळले आणि काही क्षणांतच भीषण स्फोट झाला.
ज्यात अजित पवार यांच्यासह विमानात असलेले पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर एचसी विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे.
अपघात इतका भीषण होता की, विमान पूर्णपणे जाळून खाक झाले. आगीच्या तीव्रतेमुळे बचावकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या आणि मृतदेह ओळखणे देखील शक्य नव्हते. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातात असलेला घड्याळ, त्यांनी घातलेला गॅगल आणि जॅकेटमुळे ओळखण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ ठरलं त्यांची शेवटची ओळख
यावेळी अजित पवारांचे घड्याळ आणि गॉगल यावरून यांचा मृतदेह ओळखल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ हे त्यांची शेवटची ओळख ठरल्याचे दिसून येत आहे.
Dy CM Ajit Pawar presents
बारामतीजवळील एका गावातील प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, “विमानाने प्रथम एक फेरी घेतली आणि त्यानंतर खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र लँडिंगच्या प्रयत्नादरम्यान अचानक मोठा आवाज झाला आणि जोरदार स्फोट झाला.
स्फोटानंतर आम्हाला विमानाजवळ दोन मृतदेह बाजूला पडलेले स्पष्टपणे दिसले. त्यापैकी एका मृतदेहाचा चेहरा ओळखू येत नव्हता, तर एक मृतदेह पूर्णपणे फुगलेला दिसत होता ही दृश्ये अत्यंत धक्कादायक होती. अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातात असलेला घड्याळ, त्यांनी घातलेला गॅगल आणि जॅकेटमुळे पटली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले,” असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
आयुष्यभर जपलं, त्याच घड्याळाने अखेरच्या क्षणी ओळख पटवली
अजित पवार यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याने शेवटच्या क्षणी देखील त्यांची राजकीय ओळख निर्माण करणाऱ्या घडळयाचं प्रतिक असल्याचे ठरलं. ज्याचं राष्ट्रवादीचं चिन्ह त्यांनी आयुष्यभर जपलं, त्याच घड्याळाने अखेरच्या क्षणी त्यांची ओळख पटवली.
हेही वाचा:





