Maharashtra Court Bomb Threat : महाराष्ट्र हादरला..! राज्यातील ८ हुन अधिक न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Court Bomb Threat : महाराष्ट्रातील ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी आणि हिंगोलीसह आठहून अधिक जिल्हा व सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने संपूर्ण राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Maharashtra Court Bomb Threat : राज्यातील विविध जिल्ह्यात जिल्हा न्यायालय उडवून देण्याचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली. त्यांनतर पोलीसांनी न्यायालयांचा परिसर रिकामा केला. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयाला असा धमकीचा ई-मेल आल्याची माहिती आहे. या सर्वच ठिकाणी पोलीसांनी अधिक तपास सुरू केला आहे. (Maharashtra Court Bomb Threat)
27 नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेखही त्यात करण्यात आला होता. सन 1984 मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये केला आहे. (Maharashtra Court Bomb Threat)
आपण दिलजीत दोसांझ याचा साथीदार असल्याचा उल्लेख करत, 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आरोपीने दिली आहे. (Maharashtra Court Bomb Threat)
सांगली जिल्हा सत्र न्यायालयातही बॉम्ब ठेवला असल्याचा मेल प्राप्त झाला असून बॉम्बने न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आली. न्यायालयाच्या इमारतीच्या तपासणीसाठी आणि सुरक्षितेसाठी सांगली जिल्हा पोलीस दल बॉम्बशोधक आणि एक श्वान पथकासह न्यायालयाच्या इमारतीत दाखल झाले. (Maharashtra Court Bomb Threat)
सांगली, सातारा न्यायालयानंतर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाला धमकीचा ईमेल आला. कोर्टाला ई-मेल प्राप्त होताच जिल्हा आणि सत्र न्यायालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले. त्यानंतर, संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्याचे काम पोलिसांनी केले. कोर्टातील न्यायाधीश, वकील आणि सर्व पक्षकारना कोर्टाच्या बाहेर काढण्यात आले. (Maharashtra Court Bomb Threat)
तसेच, परभणीसह हिंगोली, बीड, सांगली यासह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. या धमकीनंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, संबंधित जिल्हा न्यायालयांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या धमकीमुळे न्यायालयीन परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. (Maharashtra Court Bomb Threat)
Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ..! महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन यांचा बंगला उडवण्याची धमकी





