Thane News : ठाण्यात ४०.६ लाखांच्या अमली पदार्थांसह एकाला अटक
Thane News : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) कल्याण फाटा परिसरात सापळा रचून एका तस्कराला अटक केली आहे.

Thane News : ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी ४०.६८ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केले असून, याप्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. तो ठाणे जिल्ह्यातील पलावा परिसरातील रहिवासी असून, कल्याण फाटा (शिल-दाइघर परिसर) येथील एका हॉटेलजवळ स्कूटरवरून जात असताना त्याला पकडण्यात आले. (Thane News)
ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, झडती घेतली असता त्याच्या वाहनाच्या डिक्कीमध्ये १.३ किलो मेफेड्रोन पावडर सापडली, ज्याची किंमत ४०,६८,००० रुपये आहे. (Thane News)
पोलिसांनी त्याच्याकडून ५५० रुपये रोख रक्कम, एक मोबाईल फोन, एटीएम कार्ड आणि इतर काही वस्तूही जप्त केल्या आहेत. आरोपीविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thane News)
Thane News : ठाण्यात मोठी कारवाई ! तब्बल ‘एवढ्या’ लाखांची बनावट औषधे जप्त




