Sharad Pawar : शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, त्यांना नेमका कोणता त्रास झाला आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. (Sharad Pawar)
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा घेतला होता आढावा
शरद पवार यांनी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या समस्या सरकारदरबारी मांडण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याची माहिती आहे. (Sharad Pawar)
अचानक दौरा रद्द; प्रकृतीबाबत चर्चांना उधाण
शरद पवार यांचा आजचा दुष्काळी पाहणी दौरा रद्द करण्यात आला होता. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती आणि परिसरातील पावसाचे कारण देत दौरा रद्द झाल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. (Sharad Pawar)
मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळेच दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर ते सोलापूरहून पुण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Sharad Pawar)
रुबी रुग्णालयात त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र, त्यांना नेमका कोणता त्रास झाला आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. (Sharad Pawar)
दिवाळीनंतर करमाळ्यात दुष्काळी पाहणी
दिवाळीनंतर शरद पवार करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले. (Sharad Pawar)
बारामती आणि भिगवण परिसरात झालेल्या पावसामुळे दौऱ्यात बदल करण्यात आल्याची माहिती नारायण पाटील यांनी दिली आहे. दिवाळीनंतर शरद पवार करमाळ्यात पाहणीसाठी येतील, असेही त्यांनी सांगितले. (Sharad Pawar)





