Gokul Dudh Sangh : 10 नोव्हेंबरला निवडणूक घ्या; गोकुळ संघ अध्यक्षाबाबत न्यायालयाचे आदेश
Gokul Dudh Sangh : गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा घ्याव्यात, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत.

Gokul Dudh Sangh : गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सभा घ्याव्यात, असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. यासंदर्भातील आजच आदेश काढा, असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता यावेळी गोकुळ दुध संघाचे सर्व 25 संचालक या सभेला उपस्थित राहणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Gokul Dudh Sangh)
न्या. अभय आहुजा आणि न्या. धीरज धोटे यांच्या खंडपीठासमोर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची झालेली निवड आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी तहकूब केलेल्या सभेबाबत राजर्षी शाहू समविचारी आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. (Gokul Dudh Sangh)
गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील-चुयेकर यांची झालेली निवड वैध ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी (30 ऑक्टोबर) कोल्हापूर खंडपीठामध्ये केली होती. (Gokul Dudh Sangh)
यावर त्याच दिवशी सुनावणी होऊन महायुतीच्या सभेला अनुपस्थित राहिलेल्या संचालकांसह सरकारला पक्षकार करून म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सोमवारी या विषयावर सुनावणी झाली. (Gokul Dudh Sangh)
त्यावेळी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. तसेच यासाठी ७ दिवसांची नोटीस देऊन निवडणूक घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. (Gokul Dudh Sangh)
दरम्यान, गोकुळ दुध संघांच्या निवडणुकीत महायुतीच्या आघाडीला 12 जागा तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या. पण, बहुमताला 14 संचालकांचे संख्याबळ लागत असताना कोरम पूर्ण होणे आवश्यक असते. (Gokul Dudh Sangh)
29 ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी अधिकृत सभा बोलावण्यात आली होती. नियमांनुसार सभेसाठी 14 संचालकांचा कोरम असणे आवश्यक होते. महायुतीचे 12 संचालक या सभेला गैरहजर राहिले. त्यामुळे, 14 संचालकांचा कोरम पूर्ण होऊ शकला नाही आणि निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली होती. (Gokul Dudh Sangh)
Gokul Dudh Sangh : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून कलगीतुरा; अध्यक्ष डोंगळेंचा राजीनामा देण्यास नकार
