Maharashtra Budget 2025 : चारचाकी होणार महाग; अर्थसंकल्पात अजित पवारांनी जाहीर केली करवाढ
Updated On:

Maharashtra Budget 2025 : उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (10 मार्च) राज्याचा 2025-26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज फडणवीस सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आता राज्यात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार आहेत.
चार चाकी वाहनांसाठी एक टक्के करवाढ –
चार चाकी वाहनांसाठी एक टक्के करवाढ करण्याची मोठी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे राज्यात वाहनांच्या किमती वाढणार आहेत.





