\n

लखनौच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या डावाची सुरवात चांगली झाली नाही. 41 धावसंख्येवर त्यांना लाखोपाठ विकेट गमवाव्या लागल्या. दिल्लीच्या फलंदाजीची खऱ्याअर्थाने वाताहत केली ती ती मार्क वूडने! त्याने पृथ्वी शॉला आधी शॉर्ट बॉल टाकून सतावले. त्यानंतर एक चेंडू गूडलेंथवर टाकत शॉची दांडी गुल केली. पुढच्याच चेंडूवर मार्क वूडच्या वेगवान चेंडूने मिचेल मार्शला देखील चकवा दिला अन्‌ त्याचीही स्टंप उडाला. वूडने पाठोपाठ दोन धक्के दिल्याने दिल्ली मंदावली.

\n

तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीकडून गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून लखनौ संघाचा कर्णधार के.एल. राहुलला 8 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर लखनौच्या काईल मायर्सने दीपक हुडाच्या साथीने पहिल्या 6 षटकांत धावसंख्या 30 धावांपर्यंत नेली.

\n

येथून मायर्सने आपल्या फलंदाजीत आक्रमकता घेत धावसंख्या वेगाने पुढे नेण्यास सुरुवात केली आणि दीपकच्याच साथीने दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 79 धावांची शानदार भागीदारी केली. 17 धावा करून हुडा पॅव्हेलियनमध्ये परतला, तर मायर्सने 38 चेंडूत 2 चौकार आणि 7 षटकारांसह 73 धावांची खेळी केली. दिल्लीकडून या सामन्यात खलील अहमदने 2 तर चेतन, कुलदीप आणि अक्षर पटेल यांनी 1-1 बळी घेतले.

\n

पूरन-पंड्याची फटकेबाजी

\n

117 धावांपर्यंत 4 विकेट गमावलेल्या लखनौचा डाव संभाळत निकोलस पूरन आणि कृणाल पंड्या यांनी 5व्या विकेटसाठी 26 चेंडूत 48 धावांची जलद भागीदारी केली. पूरनने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 36 धावांची शानदार खेळी केली. तर पंड्याने 15 धावांची खेळी केली, तर आयुष बदोनीने अवघ्या 7 चेंडूत 18 धावांची खेळी करत धावसंख्या 190 च्या पुढे नेली.

\n

रिषभ पंतची आठवण

\n

दिल्ली-लखनौ सामना सुरू होण्यापूर्वी अपघातामुळे संघाबाहेर असलेला दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने ट्विट आपल्या संघाला शुभेच्छा दिल्या. “इम्पॅक्‍ट प्लेअरच्या नियमामुळे मी तुमच्या संघाचा 12वा खेळाडू होऊ शकत नाही, पण मी 13वा खेळाडू नक्कीच आहे,’ असे पंतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. त्याचवेळी संघ सहकाऱ्यांनी पंतची आठवण काढताना पंतची 17 नंबर असलेली जर्सी दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये लावलेली दिसली. काही दिवसांपूर्वी पंत भीषण कार अपघातातून थोडक्‍यात बचावला होता. पंत अपघातातून सावरत असल्याने दिल्ली संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर देण्यात आली होती. तसेच दिल्ली संघाने यंदाच्या हंगामासाठी पंतच्या जागी युवा यष्टीरक्षक अभिषेक पोरेलला संघात संधी दिलेली आहे.

\n

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

\n

\n

संक्षिप्त धावफलक –

\n

लखनौ सुपर जायंट्‌स :- 20 षटकांत 5 बाद 180(काईल मायर्स 73-38 चेंडू, निकोलस पुरन 36, आयुष बदोनी 18; खलील अहमद 2-30, चेतन सकारिया 2-53, कुलदीप यादव 1-35) विजयी वि. दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकांत 9 बाद 143 (डेव्हिड वॉर्नर 56-48 चेंडू, रिली रोसोव 30, अक्‍सर पटेल 16; मार्क वुड 5-14, रवि बिश्‍नोई 2-31, आवेश खान 2-29)

\n

 

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#IPL2023 #LSGvDC : मार्क वुडच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली ढेर; लखनौचा दणदणीत विजय","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/mar.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/lucknow-won-the-match-by-50-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/mar.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/lucknow-won-the-match-by-50-runs#webpage","name":"#IPL2023 #LSGvDC : मार्क वुडच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली ढेर; लखनौचा दणदणीत विजय","url":"https://www.dainikprabhat.com/lucknow-won-the-match-by-50-runs","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/lucknow-won-the-match-by-50-runs#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/04/mar.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/lucknow-won-the-match-by-50-runs#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/lucknow-won-the-match-by-50-runs","name":"#IPL2023 #LSGvDC : मार्क वुडच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली ढेर; लखनौचा दणदणीत विजय"}}]}}}

#IPL2023 #LSGvDC : मार्क वुडच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली ढेर; लखनौचा दणदणीत विजय