Sunidhi Chauhan : सुनिधी चौहान कॉन्सर्टमध्ये रडू लागली; प्रेक्षकांची माफी मागत म्हणाली…
Sunidhi Chauhan :

Sunidhi Chauhan : आपल्या दमदार आवाजासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध असलेली गायिका सुनिधी चौहान सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. नुकताच लखनऊमध्ये तिचा एक कॉन्सर्ट पार पडला, जिथे गाताना सुनिधीला अश्रू अनावर झाले.
७ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात सुनिधी गाणं गात असताना तिला घशाचा प्रचंड त्रास होत होता. प्रेक्षकांशी संवाद साधताना ती भावूक होऊन म्हणाली, “आज माझा घसा खूप दुखत आहे आणि माझा आवाजही साथ देत नाहीये. मला गाण्याची इच्छा आहे. माझ्यासोबत असं कधीच घडलं नव्हतं, हे खूप लाजिरवाणं आहे. मी नेहमीच माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करते, पण आज परिस्थिती तशी नाही. कृपया मला माफ करा.”
सुनिधी रडत असतानाही तिच्यातील कलाकार जिद्दीने उभा होता. “तुम्ही लोक माझ्यासोबत आहात आणि मी गाणारच,” असे म्हणत तिने आपला परफॉर्मन्स पूर्ण केला. तिच्या या प्रामाणिकपणावर आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेवर चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर तिचे प्रचंड कौतुक होत असून चाहत्यांनी तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे. Sunidhi Chauhan
View this post on Instagram
दरम्यान, ७ मार्च रोजी, सुनिधी चौहान तिच्या आय अॅम होम इंडिया टूर २०२५-२६ चा भाग म्हणून लखनऊमधील कूलब्रीझ रिसॉर्टमध्ये परफॉर्मन्स करत होती. मात्र लखनऊमधील या घटनेनंतर तिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. Sunidhi Chauhan
हेही वाचा:





