LSG vs GT Gujarat Titans captain’s reaction after defeat : आयपीएल २०२५ चा २६ वा लीग सामना लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि गुजरात टायटन्स (जीटी) यांच्यात खेळला गेला, जो लखनौने ६ विकेट्सनी जिंकला. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात लखनौने १९.३ षटकांत ४ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. सामन्यानंतर कर्णधार शुबमन गिलने गुजरातचे कारण सांगितले. विकेट्सवर फलंदाजी करणे सोपे नव्हते – लखनौविरुद्धच्या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला, “सुरुवातीपासूनच विकेट्सवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. आमचा प्लॅन असा होता की जर एखादा फलंदाज राहिला तर त्याने किमान १७-१८ षटके खेळावीत जेणेकरून आम्ही २००-२२० धावा करू शकू. पण त्यादरम्यान आम्ही सलग दोन विकेट्स गमावल्या, ज्यामुळे आमची लय बिघडली. चेंडू थांबून येत होता, त्यामुळे फलंदाजी करणे सोपे नव्हते.” नियोजित केल्याप्रमाणे झाले नाही – गिल पुढे म्हणाला, “आमचे स्ट्राईक रोटेशन म्हणजेच आम्ही ज्या पद्धतीने धावा काढतो, ते देखील आम्ही नियोजित केल्याप्रमाणे झाले नाही. भविष्यात आम्हाला यावर काम करावे लागेल. आमची रणनीती नेहमीच विकेट्स घेण्याचा प्रयत्न करायची होती. हो, आम्ही एका वेळी थोडे मागे होतो, पण जर आम्हाला २-३ विकेट्स मिळाल्या असत्या, तर सामन्याचा मार्ग बदलू शकला असता आणि तेच घडले.” हेही वाचा – LSG vs GT : शार्दुल-पूरनने रोखला गुजरातचा विजयरथ! लखनौने साधली विजयाची हॅट्ट्रिक सामना शेवटच्या षटकात गेला ते आमच्यासाठी सकारात्मक – गुजरातचा कर्णधार म्हणाला, “जेव्हा आम्ही १०-११ व्या षटकानंतर गोलंदाजी करत होतो, तेव्हा जमिनीवर थोडे दव पडले होते. चेंडू पूर्वीसारखा थांबत नव्हता. जेव्हा विरोधी संघाला ३० चेंडूत ३० धावांची आवश्यकता होती आणि सामना शेवटच्या षटकात गेला तेव्हा ते आमच्यासाठी सकारात्मक होते. दुसऱ्या टाइमआउटमध्ये, आम्ही चर्चा केली होती की सामना शक्य तितका शेवटपर्यंत घेऊन जावा लागेल.” हेही वाचा – LSG vs GT : जोस बटलरविरुद्ध शार्दुल-दिग्वेश जोडीचा जलवा! VIDEO होतोय व्हायरल! लखनौने रोखला गुजरातचा विजयरथ – आयपीएल २०२५ च्या २६ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ६ विकेट्सने पराभव केला. १२ षटकांत एकही विकेट न गमावता १२० धावा काढणाऱ्या गुजरातला २० षटकांत १८० धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल, लखनौने शेवटच्या षटकात सामना जिंकला. लखनौकडून एडेन मार्करामने ३१ चेंडूत ५८ धावा आणि निकोलस पूरनने ३४ चेंडूत ६१ धावा केल्या. शेवटी, आयुष बदोनी २० चेंडूत २८ धावा करून नाबाद राहिला. लखनौचा हा चौथा विजय आहे. लखनौ संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आला आहे.