LSG vs GT : जोस बटलरविरुद्ध शार्दुल-दिग्वेश जोडीचा जलवा! VIDEO होतोय व्हायरल!

LSG vs GT Shardul Thakur taking amazing catch video viral : आयपीएल २०२५ चा २६ वा सामना लखनौमधील एकाना स्टेडियमवर यजमान लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत १८० धावा केल्या. दरम्यान सामन्यात, शार्दुल ठाकूरने दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर जोस बटलरचा एक शानदार झेल घेतला. यानंतरक दिग्वेश राठीने ‘नोटबुक सेलिब्रेशन’ केले, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
शार्दुल ठाकूरने जोस बटलरचा घेतला शानदार झेल –
खरंतर, सामन्याच्या १६ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर, जोस बटलरने स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या वरच्या काठाला लागून शॉर्ट फाइन लेगवर शार्दुल ठाकूरकडे गेला. यादरम्यान, ठाकूरने धावत जाऊन डायव्ह करत शानदार झेल घेतला. त्याच्या अद्भुत झेलमुळे, जोस बटलरचा डाव १६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर संपला. विकेट घेतल्यानंतर, दिग्वेश राठीने त्याचे प्रसिद्ध नोटबुक सेलिब्रेशन केले. या अद्भुत झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
🔝 Catch
🔝 Celebration
🔝 Wicket🎥 Shardul Thakur's brilliant grab that brought out Digvesh Rathi's trademark celebration ™️
Updates ▶ https://t.co/VILHBLEerV #TATAIPL | #LSGvGT | @LucknowIPL pic.twitter.com/wlTRAw3ASV
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
सामन्याबद्दल बोलायचे तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. दोन्ही युवा फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १२.१ षटकांत १२० धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर अवेश खानच्या चेंडूवर मारक्रमला झेल देऊन शुबमन गिल बाद झाला. त्याच्या पुढच्या षटकात, साई सुदर्शनही रवी बिश्नोईच्या षटकात पूरनच्या हाती झेलबाद झाला.
हेही वाचा – LSG vs GT : शुबमन-साईचा मोठा पराक्रम! IPL 2025 मध्ये केला खास विक्रम
यानंतर, गुजरातने नियमित अंतराने विकेट गमावत राहिल्या आणि निर्धारित षटकांत ६ विकेट्स गमावून फक्त १८० धावाच करत आल्या. गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक ६० धावा केल्या. तर साई सुदर्शनने ५६ धावांची धमाकेदार खेळी केली. शेवटच्या ८ षटकांत ६ विकेट गमावल्यानंतर गुजरातला फक्त ६० धावा करता आल्या. लखनौकडून शार्दुल ठाकूरने चार षटकांत ३४ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोईनेही चार षटकांत ३६ धावा देत दोन विकेट्स घेतल्या.





