लोकमान्य सोसायटीची ‘सिद्धीविनायक निवेश-2025’ योजना: आकर्षक परताव्यासह गुंतवणुकीची संधी

पुणे – श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ’लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’तर्फे ’सिद्धीविनायक निवेश’-2025 ही मुदत ठेव योजना सादर करण्यात आली आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा देणार्या या योजनेस सभासद-ग्राहकांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे.
तेरा महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या गुंतवणूक योजनेसाठी 10 टक्के इतका व्याजदर असून जेष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्का अधिकचा व्याजदर आहे. सभासद-ग्राहक या योजनेत किमान दहा हजार रूपयांपासूनची गुंतवणूक करू शकतात.
सोप्या गुंतवणुक प्रक्रियेसह मर्यादित कालावधीसाठी हमखास व चांगला असा परतावा मिळवून देणारी ही योजना आहे. त्याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन लोकमान्य सोसायटी तर्फे करण्यात आले आहे.
गुंतवणुकदार घरबसल्या ’लोकमान्य डिजिटल अँप’च्या माध्यमातून देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. ’लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत किंवा 9022173597 या क्रमांकावर संपर्क साधून सभासद, ग्राहक, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती लोकमान्य सोसायटीतर्फे देण्यात अली आहे.





