पूणे : नवीन वर्षाच्या प्रारंभीच गुंतवणुकीला चालना देणाच्या उद्देशाने ’लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’ तर्फे ’आरंभ’ ही मुदत ठेव योजना सादर करण्यात आली आहे. 15 महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या गुंतवणूक योजनेसाठी 10.25 टक्के इतका व्याजदर असणार आहे. तर जेष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के इतका अधिकचा व्याजदर असणार आहे. ग्राहक-सभासद या योजनेत किमान दहा हजार रूपयांपासून गुंतवणुक करू शकतात. नव्या वर्षाच्या आरंभी आकर्षक परतवा देणारी ही मुदत ठेव योजना, सोप्या गुंतवणुक प्रक्रियेसह मर्यादित कालावधीसाठी आहे. याचा लवकरात लवकर लाभ घेण्याचे आवाहन ’लोकमान्य सोसायटी’ तर्फे करण्यात आले आहे. ’लोकमान्य डिजिटल’ अँपच्या माध्यमातून गुंतवणुकदार घरबसल्या या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. ’लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत किंवा 1800 212 4050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ग्राहक-सभासद-गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती ’लोकमान्य सोसायटी’तर्फे करण्यात आले आहे.