लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीकडून ‘मान्सून ठेव योजना’ सादर; आकर्षक व्याजदरासह गुंतवणुकीची संधी

पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.ने सभासद आणि गुंतवणूकदारांसाठी ‘मान्सून ठेव योजना’ सादर केली आहे. अल्पकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक परतावा देणारी ही योजना गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या योजनेत १०.२५ टक्के वार्षिक व्याजदर मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५० टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे.
किमान १०,००० रुपयांपासून गुंतवणूक करता येणारी ही योजना सुलभ आणि सुरक्षित आहे. मर्यादित कालावधीसाठी चांगला परतावा देणारी ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरेल, असे संस्थेने म्हटले आहे. गुंतवणूकदारांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन लोकमान्यने केले आहे.
गुंतवणुकीसाठी ‘लोकमान्य मोबाईल अॅप’द्वारे घरबसल्या सुविधा उपलब्ध आहे. तसेच, लोकमान्यच्या कोणत्याही शाखेत किंवा टोल-फ्री क्रमांक १८०० २१२ ४०५० वर संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येईल, असे संस्थेने नमूद केले आहे.





