लोकमान्य सोसायटीच्या सिंहगड रोड शाखेचे होणार स्थलांतर

विश्वासार्ह, तत्पर व अत्याधुनिक सेवेसाठी सुपरिचित असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी सिंहगड रोड शाखेचे स्थलांतर होत आहे. या शाखेचा उद्घाटन समारंभ केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोमवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी लोकमान्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सिंहगड रोडवरील ब्रम्हा प्युअर व्हेज हॉटेलच्या बाजूला उभा राहिलेल्या भव्य व्यावसायिक वास्तूत म्हणजेच शॉप नं. १८, ग्रँड होरायझन, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे ४११०४१ या ठिकाणी ही शाखा स्थलांतरीत होत आहे.
या नव्या वास्तूत शाखेच्या रूपाने सुरू होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास ठेवीदार-ग्राहक-सभासद व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे व लोकमान्य सोसायटीच्या विविध बहुउद्देशीय सेवा, गुंतवणूक योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन लोकमान्य सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी केले आहे.





