Lokmanya Society : लोकमान्य सोसायटीतर्फे ऑपरेशन सिंदूरवर व्याख्यानाचे आयोजन

पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने ऑपरेशन सिंदूर चे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (शुक्रवार,16 मे) सायंकाळी सहा वाजता नवी पेठ स्थित एस एम जोशी हॉल येथे हे व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असणार आहे.
ऑपरेशन सिंदूरवर सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते हेमंत महाजन (निवृत्त) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार किरण ठाकूर हे असणार आहेत.व्याख्यानानंतर ब्रिगेडियर महाजन हे उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
पुणेकर नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव यांनी केले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा बळी गेला त्यानंतर भारतीय लष्कराने धडक कारवाई करत पाकिस्तानच्या सहाहून अधिक हवाई तळे उध्वस्त केले आहेत.





