Sachin Ahir : “मला सेटल होऊ दे, रन्स करू दे, मग इतरांना आणतो”; उपसभापती झाल्यानंतर सचिन अहिर यांचं दुसऱ्याच दिवशी मोठं विधान
Sachin Ahir : आता सचिन अहिर यांनी देखील तोच कित्ता गिरवत आगामी काळात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Sachin Ahir : नुकतेच उद्धवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर आता विधान परिषदेचे उपसभापती झाले आहेत. त्यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. आज त्यांच्या कामकाजाचा पहिला दिवस असून ते विधीमंडळात दाखल झाले. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत एक मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“मला सेटल होऊ दे, रन्स करू दे, मग इतरांना आणतो” असं विधान विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केलं असून आगामी काळात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत त्यांनी आपल्या विधानातून दिले आहेत. यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे.
एकीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अॅापरेशन ३.० सुरू करणार असल्याचे संकेत दिले होते. आता सचिन अहिर यांनी देखील तोच कित्ता गिरवत आगामी काळात मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Sachin Ahir)
मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू असून जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना देखील घडत आहेत. नुकतेच मुंबईतील चेंबूर येथे एका स्कूल व्हॅनवर झाड कोसळले. या दुर्देवी घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला तर काही मुलं जखमी झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. यावर बोलताना सचिन अहिर यांनी मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून सध्याच्या परिस्थितीवर आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. महापौर देखील रस्त्यावर उतरून काम करत आहेत.
हेही वाचा : Khashaba Teaser : कुस्तीच्या आखाड्यातून ऑलिम्पिकपर्यंतचा थरार! ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर रिलीज, मुख्य भूमिकेत…
आगामी काळात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष (Sachin Ahir)
आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात आहे. त्यांच्या विधानातून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे ठाकरेंचे आमदार सुनील शिंदे हे देखील शिंदेसेनेत दाखल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांवर स्वतः सुनील शिंदे यांनी खुलासा केला असून, चर्चां फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.





