Newasa News : पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांना उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मानाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देवसडे या छोट्याशा गावातील (Newasa News) भूमिपुत्र आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त (IPS) डॉ. पंजाबराव उगले यांनी आपल्या उत्तुंग कामगिरीने पुन्हा एकदा जिल्ह्याचा व संपूर्ण पोलीस दलाचा नावलौकिक वाढवला आहे.

Newasa News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील देवसडे या छोट्याशा गावातील (Newasa News) भूमिपुत्र आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त (IPS) डॉ. पंजाबराव उगले यांनी आपल्या उत्तुंग कामगिरीने पुन्हा एकदा जिल्ह्याचा व संपूर्ण पोलीस दलाचा नावलौकिक वाढवला आहे.
त्यांच्या प्रदीर्घ, उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवेची दखल घेत स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मानाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित एका भव्य सोहळ्यात हा गौरव सोहळा (Newasa News) पार पडला. यावेळी व्यासपीठावर ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे/पांचाळ, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवी फाटक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. उगले यांच्या या ऐतिहासिक यशामुळे नेवासे तालुक्यासह संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयात आनंदाचे वातावरण आहे.
डॉ. पंजाबराव उगले यांच्या या सन्मानाबद्दल (Newasa News) प्रशासकीय आणि पोलीस वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आयएएस अधिकारी अविनाश ढाकणे, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, आयएएस अधिकारी विनायक नरवडे, पी.एस. श्रीकांत पाठक, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि यवतमाळचे उपजिल्हाधिकारी विकास कर्डिले आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉ. उगले यांचे दूरध्वनीवरून व प्रत्यक्ष भेटून विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






