Vidhan Parishad Upsabhapati : सचिन अहिर Vs ज. मो. अभ्यंकर! विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आज रंगणार सामना
Vidhan Parishad Upsabhapati : जगन्नाथ अभ्यंकर हे शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेसाठी ठाकरे गटाचे उमेदवार

Vidhan Parishad Upsabhapati : ठाकरे गटाचे विश्वासू आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षांतरानंतर त्यांनी तातडीने विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
तर त्यांच्या विरोधात उद्धवसेनेकडून शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी शिंदे आणि ठाकरेंच्या पक्षात लढत होणार आहे.
Police Transfers : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहा निरिक्षकांच्या बदल्या
राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक जाहीर झाली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी 1 जुलै, सोमवारी उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर केली होती.
काल सकाळी 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत असताना केवळ पंधरा मिनिटे आधी अचानक शिंदेसेनेच्या वतीने उबाठाचे आमदार सचिन अहिर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदेसेनेने उमेदवाराच्या नावाबाबत अखेरपर्यंत गोपनीयता राखली होती.
त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानेही आपली उमेदवारी जाहीर केली. शिवसेना ठाकरे गटाने जगन्नाथ अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला.
जगन्नाथ अभ्यंकर हे शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे उपसभापतीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्टच झाले. त्यानुसार आज विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि ज. मो. अभ्यंकर यांच्यात प्रमुख सामना होणार आहे.
हेही वाचा:
Pimpri : ‘नाव समिती’समोर प्रशासनाचे हात वर! अभिप्राय देण्याऐवजी निर्णय समितीवरच ढकलला






