Sachin Ahir : ….आणि एकनाथ शिंदेंनी करेक्ट कार्यक्रम केला! शिवसेनेकडून उपसभापतेची उमेदवारी मिळालेले सचिन अहिर कोण आहेत?
Sachin Ahir : या खेळीमधून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी गाफील ठेवून चर्चेत नसलेल्या नावाला थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीचं तिकीट दिलं.

Sachin Ahir : नुकतचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अॅापरेशन टायगर यशस्वी केलं. सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरतोच तोच एकनाथ शिंदेंनी आश्चर्याचा धक्का दिला. मोठा डावा टाकला आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सचिन अहिर (Sachin Ahir )यांना शिवसेनेकडून विधापरिषदेच्या उपसभापती पदाचं तिकीट देत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. या खेळीमधून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी गाफील ठेवून चर्चेत नसलेल्या नावाला थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीचं तिकीट दिलं.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हे तिघेही विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून अर्ज भरायला पोहोचले, त्यावेळी सचिन अहिर शिंदे गटाकडून अर्ज भरतानाचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवीन राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले. सुरुवातीला अनेकांचा यावर विश्वासू बसत नव्हता. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
कोण आहेत सचिन अहिर ? (Sachin Ahir)
चळवळीत प्रभावी नेतृत्वाची छाप
सचिन अहिर यांनी १९९३ मध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघातून आपल्या सार्वजनिक आणि कामगार चळवळीतील प्रवासाला सुरुवात केली. संघटनेचे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. १९९६ पासून त्यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे नेतृत्वही स्वीकारले. याशिवाय माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या प्रमुख औद्योगिक आस्थापनांच्या कामगार संघटनांचे नेतृत्व करत त्यांनी कामगारांच्या वेतनवाढीसाठी यशस्वी करार घडवून आणले आणि कामगार चळवळीत प्रभावी नेतृत्वाची छाप पाडली.
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश (Sachin Ahir)
राजकारणात १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते प्रथमच विधानसभेत निवडून आले. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्येही त्यांनी आमदारकी कायम राखली. २००९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाची धुराही सांभाळली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.
आदित्य ठाकरे यांच्या विजयामागे सचिन अहिर यांची महत्त्वपूर्ण भूमिका
शिवसेनेत प्रवेशानंतर २०२० मध्ये त्यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. वरळी मतदारसंघातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विजयामागे सचिन अहिर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मानले जाते. त्यांच्या या योगदानाची दखल घेत २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. Sachin Ahir
हेही वाचा : Iron Deficiency: सतत थकवा येतोय? शरीरात लोहाची कमतरता तर नाही ना?





