Eknath Shinde: ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याने शिंदेंच्या सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी केला अर्ज दाखल
Eknath Shinde: सहा खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का

Eknath Shinde: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी जाहीर केला असून, १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता मतदान होणार आहे.
विधान परिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी हे पद शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाणार असल्याचे निश्चित मानले जात होते. विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर नेमकं कोणाची वर्णी लागणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. (Eknath Shinde)

Eknath Shinde: ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! बड्या नेत्याने शिंदेंच्या सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी केला अर्ज दाखल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सहा खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर आता ठाकरे गटासाठी हा दुसरा धक्का मानला जात आहे.
विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.
आमदार देखील शिंदे गटात जाणार असल्याचा दावा अन् शिंदेंचा धक्कातंत्र (Eknath Shinde)
ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार देखील शिंदे गटात येतील, असा दावा करण्यात येत होता. त्यातच आज ठाकरेंचं विधान परिषदमधील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्याने ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची ताकद (Eknath Shinde)
वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी त्यांनी वरळी मतदारसंघात काम केला आहे शिवाय कामगार संघटनांच्या एकजुटीमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडून सचिन अहिर यांना पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याचे वृत्तही समोर आले होते.
सचिन अहिर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. आदित्य ठाकरेंसाठी सचिन अहिरांनी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला होता. ते विधानसभा निवडणुकीत तीन वेळा, विधानपरिषदेवर एकदा विजयी झाले आहेत.
त्यांनी वरळीमधून १९९९, २००४, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी मिळवला. सध्या ते ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. मात्र आता त्यांनी शिंदेंच्या सेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापतीचा अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भुंकप झाल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा:
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत संजय राऊतांचा खळबळजनक दावा म्हणाले…





