लंडन : कोणताही राजकीय नेता हा सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करीत असला तरी या सर्वसामान्य जनतेपेक्षा राजकीय नेत्याचे आयुर्मान जास्त असते याशिवाय त्यांच्या उत्पन्नाची पातळी ही सर्वसामान्य जनतापेक्षा जास्त असते असा निष्कर्ष ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील एका संशोधनामध्ये समोर आला आहे.
हे संशोधन युरोपियन जर्नल ऑफ एपिदेमिओलॉजी या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले असून त्यामध्ये असे म्हणण्यात आले आहे की सर्व सामान्य जनतेपेक्षा राजकीय नेत्यांचे आयुष्य 3 ते 7 वर्षांनी जास्त असते संशोधनाच्या निमित्ताने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी येथील तज्ञांनी अकरा देशातील 57 हजार पेक्षा जास्त राजकीय नेत्यांचा अभ्यास केला एकोणिसाव्या शतकातील राजकीय नेत्यांना तर दीडशे वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असावे असे वाटत होते असे या संशोधनात म्हटले आहे.
एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेता यांच्या आयुर्मान यामध्ये फारसा फरक नव्हता पण, 20 व्या शतकात राजकीय नेत्यांच्या उत्पन्नामध्ये जशी वाढ होत गेली तसतसे त्यांची जीवनशैली ही सुधारली आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुर्मानवर सकारात्मक पद्धतीने झाला आणि राजकीय नेत्यांचे आयुर्मान हे सर्वसामान्य जनतेपेक्षा वाढले. एकाच वयाची सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेता यांचा अभ्यास केला असता काही देशांमध्ये सर्व सामान्य जनतेपेक्षा राजकीय नेत्यांचे आयुर्मान 2 ते 3 टक्क्यांनी जास्त असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
अमेरिकेतील राजकीय नेते सर्व सामान्य जनतेपेक्षा 7 वर्ष जास्त अधिक जगतात तर ब्रिटनमधील राजकीय नेते सर्वसामान्य जनतेपेक्षा दहा वर्ष अधिक जगतात असाही निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे