Suraj Chavan Wedding : बिग बॅास मराठी पाचव्या सीझनचा विजेता झापूक झुपूक स्टार सर्वांच्या मनात घर केलेला सुरज चव्हाणचे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी लग्न होणार आहे. त्याच्या मामाची मुलगी संजना हिच्यासोबत सूरज सात फेरे घेणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सूरज लवकरच लग्नबंधनात अडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर सुरजचे लग्न पार पडणार असून, यामुळे त्याच्या घरात लग्नीनघाई सुरू झाली आहे. अशातच सूरजची होणारी बायको संजना हिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, या व्हिडीओत ती भन्नाट डान्स करताना दिसत आहे. नुकतेच सुरजने त्याच्या नव्या आलिशान घराचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता याच घरात सूरज त्याची होणारी बायको संजनासोबत संसार थाटणार आहे. सूरज आणि संजनाचा पुणे जिल्ह्यातील सासवड-पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या एका मंगलकार्यालयात लग्नसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. View this post on Instagram A post shared by Bhagyashri Makeup artist (@bhagyashri_mekeup_artist) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण आणि संजनाचे लग्न ठरल्यापासूनच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. त्याची होणारी बायको कोण आहे, तिची ओळख कोकण हार्टेड गर्लेने करून दिली होती. तिने दोघांना केळवणाला घरी बोलावले होते. त्यावेळी दोघांचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. पारंपारिक लूकमध्ये सुरजची होणारी बायको संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. त्याच सोहळ्याचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत संजना धमाल डान्स करताना दिसत आहे. तिचा लूक पारंपारिक असल्याने लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत तिने गाण्यावर धरलेला ठेका नेटकऱ्यांना खूपच भावला आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. संजनाने पारंपरिक दागिने परिधान केलेले दिसत असून, केसात गजरा माळलेला आहे. संजना या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हेही वाचा : निवडणूक आयोगाचा नगर परिषदेसंदर्भात मोठा निर्णय; ‘या’ जागेवरील निवडणूकांना स्थगिती