रितेश देशमुखाच्या चित्रपटात ‘संजू बाबा’! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील सेटवरचा व्हिडीओ व्हायरल; लूकने उत्सुकता शिगेला

Sanjay Dutt : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “राजा शिवाजी” हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनाची दुराही त्यांनी स्वतः घेतली आहे. यामुळे अफजल खानच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. अखेर बॅालीडवूधील प्रसिद्ध अभिनेता अफजन खानची भूमिकेत दिसणार असून, सोशल मीडियावर अभिनेत्याचा सेटवरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पिंक व्हिलाने त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिनेता संजय दत्त दिसत असून तोच चित्रपटात अफजलखानची भूमिका साकारणार आहे. १ मे २०२६ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांचीही नावं समोर आली असून, कलाकारांची मोठी फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषेतमध्येही प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अपडेट अभिनेता रितेश देशमुख याने सोशल मीडिया अकाऊंवरून पोस्टद्वारे शेअर केली होती. हा त्याचा पहिल्याच दिग्दर्शक चित्रपट असून, त्याच्या चाहत्यांना चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या ट्रेलरकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले असून, हा चित्रपट भव्य दिव्य स्वरुपाचा असणार हे अगोदरच रितेशने स्पष्ट केले होते.
हेही वाचा : “देशात वैवाहिक अत्याचारासाठी पतींना शिक्षा का नाही?” ; शशी थरूर यांचे मोठे विधान





