मुंबई – कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या.
नुकतंच, बिग बॉसच्या घरात दुप्पट आव्हानं आणि दुप्पट अडथळे घेऊन स्पर्धेचा दुसरा आठवडा सुरू झालाय. या आठवड्यात घरात ‘जोडी की बेडी’ ही थीम असून, घरातील प्रत्येक सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आहेत.
View this post on Instagram
यंदाच्या सिझनमध्ये कलाकारांसोबत काही सामाजिक कार्यकर्त्या म्हणजेच भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई आणि किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीपासूनच या दोन्ही स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित केले आहे.
पण, काल शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली आहे. आणि त्यांना काही काळ डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचारांकरिता बिग बॅासच्या घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे आजपासून त्यांच्यासाठीच्या व्होटिंग लाईन्स बंद राहतील.