एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत..’ आणि “बुक्कीत टेंगुळ’ या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक स्टार ‘सुरज चव्हाण’ मराठी बिग बॉस ५ मधून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
घरात सुरज आपल्या प्रामाणिक स्वभावाने प्रेक्षकांची मन जिंकत आहे. नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये घरातील इतर कलाकार मंडळीसमोर सूरज आधी खूप शांत होता, मात्र बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवला आणि मग सूरज गुलीगत नडला. शोमध्ये सूरज एकटा नडतो आणि एकटा भिडतो, सूरजचा हाच स्वभाव महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस उतरला आहे.
View this post on Instagram
त्याने या एपिसोमध्ये अभिजित सावंतसोबत बोलतांना आपल्या मनातील बोलून दाखवले तो म्हणाला, ‘दादा..ट्रॉफी तर मीच नेणार..यांना कुणाला हाथ लावू देणार नाही. शेवटचं आलो शेवटचं जाणार.. पहिले खंडोबाला जाणार .. आज मी नडतो यावर अभिजित सावंत म्हणतो तुझा हक्क आहे, आम्हाला सुद्धा तू विनर झाला तर आनंद होणार.’ सुरजचे हे वाक्य सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा गुलीगत किंग सूरज चव्हाणला फुल सपोर्ट असल्याचं दिसत आहे. नेटकरी सूरज चव्हाणसाठी कमेंट करत त्याला पाठिंबा देताना दिसत आहे.
बिग बॉसमध्ये आल्यावर सूरज चव्हाणच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे. सूरज चव्हाणचे इंस्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स आहे. महत्त्वाचं म्हणजे सूरजला चॅलेंज देणाऱ्या जान्हवीपेक्षाही सूरजचे फॉलोअर्स चार पटीने जास्त आहेत.