GT vs MI : मुंबईच्या विजयात गुजरातच्या खेळाडूने बजावली महत्त्वाची भूमिका, स्वत:च्या पायावर मारली ‘कुऱ्हाड’

Why Kusal Mendis Faces Criticism after GT vs MI match : पाच वेळचा चॅम्पियन संघ मुंबईने एलिमिनेटरमध्ये गुजरातविरुद्ध बाजी मारत सहाव्यांदा चॅम्पियन होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता त्यांचा सामना रविवारी दुसऱ्या क्वालिफारमध्ये पंजाबविरुद्ध होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईने २२९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरात संघ निर्धारित षटकात २०८ धावाच करु शकला. पण, या सामन्यात असे काहीतरी घडले, ज्यामुळे गुजरातचे चाहते कुसल मेंडिसवर खूप टीका करत आहेत.
गुजरातचे चाहते कुसल मेंडिसवर का संतापले?
क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजांना विचित्र पद्धतीने बाद होताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. कधीकधी गोलंदाजाच्या उत्कृष्ट चेंडूमुळे तर कधीकधी क्षेत्ररक्षकाच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागते. पण एलिमिनेटर सामन्यात कुसल मेंडिसने ज्या प्रकारे आपली विकेट गमावली ती आत्महत्येपेक्षा काही कमी म्हणता येणार नाही.
कुसल मेंडिसने काय केली चूक?
Looks like #Ambani has paid a huge amount for Kusal Mendis today
First he dropped 3-4 catches and now he lost his wicket like this,Gujarat Titans have been sold
It seems like Ambani is making Mumbai Indians win#kusalmendis #MIvGT #GTvsMI#Eliminatorpic.twitter.com/hGpnmTXTN6
— Rahul Gupta (@RahulGu04197245) May 30, 2025
Jos Buttler is being missed badly by the GT bowlers tonight! 🫣 #IPL2025 #GTvsMI #KusalMendis | 📸 : JioStar pic.twitter.com/fB95aAdbSK
— OneCricket (@OneCricketApp) May 30, 2025
कारण मेंडिसने धमाकेदार सुरुवात केल्यानंतर सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तोल गेल्याने पाय यष्टीवर आदळला, ज्यामुळे तो हिट विकेट झाला. गुजरातच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीका करण्याचे कारण एवढेच नाही, तर या सामन्यात त्याने दोन मोठ्या खेळाडूंचे झेल सोडले. यामध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. जर त्याने रोहितचा झेल सोडला नसता, तर मुंबईची धावसंख्या २०० च्या पुढे गेली नसती. रोहित शर्माच्या शानदार खेळीमुळेच मुंबईने गुजरातला मोठे लक्ष्य दिले.
हेही वाचा – GT vs MI : ‘आज माझ्यासाठी ‘तो’ दिवस होता…’, रोहित शर्माचं मुंबईच्या विजयानंतर मोठं वक्तव्य
हार्दिक पंड्याचा निर्णय ठरला योग्य –
या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांच्या जोडीने हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले. पॉवरप्लेमध्येच मुंबईने ७९ धावा केल्या. बेअरस्टोने फक्त २२ चेंडूंचा सामना करत ४७ धावांची जलद खेळी केली.
हेही वाचा – GT vs MI : साई सुदर्शनने गिलला मागे टाकत रचला इतिहास! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
तसेच रोहित शर्माने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने शानदार ८१ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने ३३ (२०) आणि तिलक वर्माने २५ (११) धावा केल्या, तर कर्णधार हार्दिकने २२ (९) धावा केल्या. त्यामुळे मुंबईला २२८ धावांपर्यंत मजल मारता आली.





