GT vs MI : ‘आज माझ्यासाठी ‘तो’ दिवस होता…’, रोहित शर्माचं मुंबईच्या विजयानंतर मोठं वक्तव्य

Rohit Sharma’s Match Winning 81 in IPL 2025 Eliminator : आयपीएल २०२५ च्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो रोहित शर्मा होता. हिटमॅनने ८१ धावांची शानदार खेळी केली आणि मुंबईला २२८ धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले, ज्याच्या प्रत्युत्तरात जीटी फक्त २०८ धावाच करू शकली. या खेळीसाठी रोहितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. जेव्हा माजी कर्णधार हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आला, तेव्हा तो मला आजचा दिवस माझा होता. यासाठी त्याने स्वतःला ‘भाग्यवान’ म्हटले.
‘आजचा दिवस आमच्यासाठी चांगला होता’ –
खरं तर, डावाच्या सुरुवातीलाच रोहितचे काही झेल जीटीच्या खेळाडूंनी सोडले, तर काही शॉट्स जे त्यांच्या फिल्डरकडे जायला हवे होते ते गॅपमध्ये गेले. रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला, “मी यंदाच्या हंगामात फक्त चार अर्धशतकं झळकावली आहेत. आणखी अर्धशतकं करणं नक्कीच चांगलं वाटलं असतं. एक संघ म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी चांगला होता. या एलिमिनेटर सामन्याचं महत्त्व आणि त्यातून पुढे जाण्याची गरज मला पूर्णपणे समजते. संपूर्ण संघाच्या प्रयत्नांबद्दल मला खरोखर अभिमान आहे.”
‘मी सगळं बाजूला ठेवून खेळतो’ –
𝗧𝘄𝗼 𝗺𝗼𝗿𝗲 𝘁𝗼 𝗴𝗼 ✌️@mipaltan have their eyes set on the big prize 👀🏆
Watch the Match Highlights ▶ https://t.co/XZ1j1xE8YP#TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/e95uQLxd5l
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “जेव्हा मी खेळतो, तेव्हा मी सगळं बाजूला ठेवून माझं सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. मी संघासाठी माझं योगदान कसं देऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करतो. मला मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घ्यायचा होता. मला आनंद आहे की मी ते करू शकलो आणि संघाला चांगल्या स्थितीत आणू शकलो. दव पडल्यामुळे हे आव्हानात्मक ठरणार होते. गोलंदाजांनी खूप चांगल्या प्रकारे धैर्याने सामना केला.”
हेही वाचा – GT vs MI : साई सुदर्शनने गिलला मागे टाकत रचला इतिहास! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
‘मला नशीबाने साथ दिली’ –
He is in the mood tonight 😎
Rohit Sharma, the 𝐁𝐢𝐠 𝐌𝐚𝐭𝐜𝐡 𝐏𝐥𝐚𝐲𝐞𝐫 🫡
Updates ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile | @ImRo45 pic.twitter.com/WJsarasZuI
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
हिटमॅन म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी यापूर्वीही या स्पर्धेत असे फटके खेळलो आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले आहेत. पण कुठेतरी तुम्हाला नशिबाची साथ हवी असते आणि आज माझ्यासाठी तो दिवस होता. मला नशीबाने साथ दिली कारण काही झेल सुटले. पण तरीही तुम्हाला खेळावे लागते.”
हेही वाचा – GT vs MI : रोहितचा रणसंग्राम: IPL प्लेऑफमध्ये मोडला स्वतःचाच ४ वर्षांपूर्वीचा खास विक्रम
‘गती आणि सातत्य राखण्यावर लक्ष केंद्रित केले’ –
हिटमॅन म्हणाला पुढे म्हणाला, “मी गती आणि सातत्य राखण्यावर लक्ष केंद्रित केले होते. हा एक चांगला प्रयत्न होता. जॉनीला मी अनेक वर्षांपासून दुसऱ्या बाजूने खेळताना पाहिले आहे. त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत हे आम्हाला माहीत आहे. या स्वरूपात खेळण्याचा त्याला खूप अनुभव आहे. असं कधीच वाटलं नाही की तो पहिला सामना खेळत आहे. आम्हाला चांगली सुरुवात मिळाली आणि आम्ही त्याचा फायदा उचलला.”





