IND vs ENG : ‘भारताचा ‘हा’ फिरकीपटू दुसरा शेन वॉर्न बनू शकतो…’, कसोटी मालिकेपूर्वी माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Kuldeep Yadav Tipped as Next Shane Warne : शेन वॉर्नला जगातील सर्वकालीन महान लेगस्पिनर मानले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नसारखा लेगस्पिनर जागतिक क्रिकेटमध्ये आजवर दुसरा कोणी आलेला नाही. मात्र, आता भारताचे माजी गोलंदाज आणि भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी एका भविष्यवाणीतून अशा गोलंदाजाबद्दल सांगितले आहे, जो भविष्यात जागतिक क्रिकेटमध्ये ‘दुसरा शेन वॉर्न’ बनू शकतो.
कुलदीप यादव दुसरा शेन वॉर्न – भरत अरुण
भरत अरुण यांनी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याच्या क्षमतांची तुलना शेन वॉर्नशी केली आहे. अरुण कुलदीपच्या कौशल्याबद्दल बोलताना म्हटले की, “तो इंग्लंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतो.” अरुण यांनी इंग्लंडमधील वॉर्नच्या यशाबद्दल बोलताना सूचवले की, कुलदीप यादवदेखील असेच यश मिळवण्यास सक्षम आहे.
भरत अरुण काय म्हणाले?
New Threads 🧵
Same Enthusiasm 👌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/cvJcSLSmd6
— BCCI (@BCCI) June 8, 2025
रेव्हस्पोर्ट्झशी बोलताना अरुण म्हणाले, “मनगटी फिरकीपटू नेहमीच प्रभावी ठरले आहेत, विशेषतः इंग्लंडमध्ये. सुरुवातीलाही, जेव्हा खेळपट्टीवर थोडा ओलावा असतो तेव्हा मनगटी फिरकीपटूंना मदत मिळू शकते. वेगवान गोलंदाजांनी निर्माण केलेले खडबडीत भाग देखील भूमिका बजावतात.” भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुणबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि ४ विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. अरुणने त्यांच्या ४८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण ११० बळी घेतले आहेत. भरत अरुणची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच लहान राहिली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाची वाढली चिंता, ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत
खडतर क्षेत्राचा वापर करणे ही एक कला –
माजी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले, “खडतर क्षेत्राचा वापर करणे ही एक कला आहे. ती फक्त गोलंदाजीपुरती मर्यादित नाही. जेव्हा आपण अशा गोलंदाजांचा विचार करतो, तेव्हा शेन वॉर्न लगेच लक्षात येतो. इंग्लंडमध्ये यशस्वी होण्यासाठी कुलदीपकडे आवश्यक कौशल्ये आहेत. सध्याचे भारतीय गोलंदाजी आक्रमण अनुभवहीन असले तरी, त्यात प्रचंड क्षमता आहे.”
हेही वाचा – R Ashwin : अश्विनचा संताप! लेग-स्टंपच्या बाहेर चेंडू, तरीही LBW; पंचांशी भिडला, पाहा VIDEO
शेन वॉर्नबद्दल बोलायचे झाले तर, वॉर्नने इंग्लंडच्या भूमीवर २२ कसोटी सामने खेळले आणि या काळात तो १२९ विकेट्स घेण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, कुलदीप यादवने आतापर्यंत इंग्लंडमध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला आहे. कुलदीप यादवने आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण ५६ बळी घेतले आहेत.





