IND vs ENG : कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाची वाढली चिंता, ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

IND vs ENG Rishabh Pant Injured During Practice : टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध त्यांच्या भूमीवर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचला आहे. यानंतर भारतीय खेळाडूंनी सराव सुरू केला आहे आणि इंग्लंडच्या परिस्थितीशी परिचित होण्याचा प्रयत्न करत आहेत. या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. कारण यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सरावादरम्यान दुखापत झाली आहे.
ऋषभ पंतला सरावादरम्यान झाली दुखापत –
भारतीय संघाच्या सराव सत्राच्या पहिल्याच दिवशी पंतला दुखापत झाल्यानंतर एक अस्वस्थ करणारी बातमी आली. रेव्हस्पोर्ट्झच्या वृत्तानुसार, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला फलंदाजी करताना ही दुखापत झाली. चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या कोपराच्या भागात लागला. त्यानंतर पंतला वेदना आणि त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने स्वतःला नेट्सपासून वेगळे केले.
पंतच्या दुखापतीवर काही दिवसांत येणार अपडेट –
Rishabh Pant in practice session 🕷️💥
He is completely fit and fine and hits sixes against spinners during practice. pic.twitter.com/1nUL69Ar7f— Ankur (@cricwithpant2) June 9, 2025
त्यानंतर भारतीय संघाची वैद्यकीय टीम आली, ज्यांनी पंतच्या दुखापतीची गंभीर दखल घेतली. वैद्यकीय टीमने वेदनांनी त्रस्त असलेल्या ऋषभ पंतला आराम दिला. त्यांनी पंतच्या दुखापतीच्या ठिकाणी बर्फाचा पॅक लावला. आता पंतची दुखापत खरोखरच गंभीर आहे की नाही हे येत्या काही दिवसांत कळेल.
हेही वाचा – R Ashwin : अश्विनचा संताप! लेग-स्टंपच्या बाहेर चेंडू, तरीही LBW; पंचांशी भिडला, पाहा VIDEO
दुखापतीनंतर पंतने नेट सोडले, पण तो संघासोबत मैदानावरच राहिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुखापतीपूर्वी पंत फलंदाजी करत असताना तो चांगल्या लयीत दिसत नव्हता. या काळात तो दोन किंवा तीन धावांवर बादही झाला. याशिवाय, तो गोलंदाजाला चांगले फटके मारण्यासही सक्षम दिसत नव्हता.





