nagar | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्र प्रसंगी ससाणे बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मा.नगरसेवक दिलीप नागरे, राजेंद्र सोनवणे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, नजीर शेख, रियाज पठाण, भगवान जाधव, भैया अत्तार, युनूस पटेल, पुंडलिक खरे, जाफर शहा, वैभव पंडित, विशाल साळवे, राजेश जोंधळे, सागर दुपाटीआदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ससाणे म्हणाले की, शैक्षणिक व समाज सुधारणांच्या चळवळीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे योगदान दिले. सावित्रीबाई फुले प्रभावशाली कवयित्री, आदर्श शिक्षिका, नि:स्वार्थी व धडाडीच्या समाजसेविका, स्त्री-पुरुष समानतेच्या प्रणेत्या होत्या. सावित्रीबाईंनी ज्ञानदानाचे कार्य यशस्वीपणे पार पाडून देशापुढे एक नवा आदर्श निर्माण केला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.





