Amol Kolhe : “हा देश वाचवायचा असेल तर…”; ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
मालिका बंद होण्यामागे टीआरपीचे कारण पुढे येत असताना अमोल कोल्हे यांनी या मुद्द्यावरही स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की...

Amol Kolhe | Mee Savitribai Jyotirao Phule : समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका येत्या १४ जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
अवघ्या काही महिन्यांतच मालिका बंद होत असल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मालिकेतील प्रमुख अभिनेता आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. (Amol Kolhe)
जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे चित्रण मालिकेत करण्यात आले होते. मात्र केवळ १५२ भागांनंतर मालिकेचा प्रवास संपणार असल्याने अनेक प्रेक्षकांनी निराशा व्यक्त केली आहे.
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी महात्मा जोतीराव फुले यांची, तर मधुराणी प्रभुलकर यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली होती. याशिवाय राजसी भावे आणि अभिषेक देशमुख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
डॉ. अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले… (Amol Kolhe)
दि. १४ जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील हेही माहित नाही. मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की, जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं.
१४ जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो.
मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील हेही माहित नाही. मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की, जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं… pic.twitter.com/rNoCJQHGcu
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 10, 2026
आणि हा महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल, तर त्याची वैचारिक बैठक पुन्हा एकदा मजबूत करावी लागेल. त्यामध्ये खारीचा वाटा का होईना, जर या माध्यमातून उचलला जात असेल, तर नक्कीच माझी तयारी आहे.
Gen Z विषयी सगळे बोलतात. तरुणाईकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला आहे का? त्यांची वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का?
Gen Z विषयी सगळे बोलतात. तरुणाईकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला आहे का? त्यांची वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ती तयार झाली नसेल, जर ती अर्धवट आणि कच्ची असेल, तर तिला घडवण्याची, त्यांच्यावर… pic.twitter.com/1F1zIgMPe3
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 10, 2026
आणि जर ती तयार झाली नसेल, जर ती अर्धवट आणि कच्ची असेल, तर तिला घडवण्याची, त्यांच्यावर री कोणाची आहे? हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची जबाबदारी कोणाची आहे? एवढंच फक्त चिंतन करणं आजच्या परिस्थितीत गरजेचं आहे!
टीआरपी बद्दल अमोल कोल्हे काय म्हणाले? (Amol Kolhe)
मालिका बंद होण्यामागे टीआरपीचे कारण पुढे येत असताना अमोल कोल्हे यांनी या मुद्द्यावरही स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “टीआरपी हा एक निकष असला तरी तोच अंतिम सत्य नाही. एखाद्या मालिकेचे दीर्घकालीन मूल्य, तिचा सामाजिक प्रभाव आणि संग्रहणीय महत्त्व याचाही विचार व्हायला हवा.”
त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या मालिकांची उदाहरणे देत सांगितले की, ‘राजा शिवछत्रपती’ आजही प्रेक्षकांकडून आवर्जून पाहिली जाते, तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ अनेक भाषांमध्ये डब होऊन देशभर पोहोचली.
आज अनेक प्रेक्षक मालिका टीव्हीपेक्षा ओटीटीवर पाहतात. मात्र पारंपरिक टीआरपी मोजणीमध्ये या प्रेक्षकसंख्येचा समावेश होत नाही. त्यामुळे केवळ टीआरपीच्या आधारे एखाद्या मालिकेचे यश-अपयश ठरवणे योग्य नाही. असं त्यांनी सांगितलं.





