RCB vs KKR : पावसाने केकेआरच्या प्लेऑफच्या आशेवर फेरलं पाणी! आरसीबीने गुणतालिकेत पटकावलं अव्वल स्थान

RCB vs KKR match abandoned due to rain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील आयपीएलचा ५८ वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्याची नाणेफेकही होऊ शकली नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील संघ १७ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला. दरम्यान, केकेआर संघ १२ गुणांसह प्रवास संपला असून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
केकेआर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर –
कोलकाता हा चालू हंगामातून बाहेर पडलेला चौथा संघ ठरला आहे. कोलकातापूर्वी, सनरायझर्स हैदराबाद (SRH), राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हे संघ स्पर्धेतून बाहेर पडले होते. केकेआर १३ सामन्यांत १२ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्याने पाच विजयांची नोंद केली. केकेआरचे दोन सामने पावसामुळे वाया गेले. शेवटचा साखळी सामना जिंकून कोलकाता जास्तीत जास्त १४ गुण मिळवू शकेल.
Match 5️⃣8️⃣ between @RCBTweets and @KKRiders has been called off due to rain.
Both teams get a point each.#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/igRYRT8U5R
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2025
आरसीबीने पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये पटकावले अव्वल स्थान-
अंजिक्य रहाणे ब्रिगेडचा शेवटच्या सामन्यात एसआरएचशी सामना होईल. त्याच वेळी, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-१ चे स्थान मिळवले आहे. १२ सामन्यांत ८ विजयांसह आरसीबीचे १७ गुण आहेत. बंगळुरू संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहे. पाटीदार ‘सेना’ने गुजरात टायटन्स (जीटी) ला दुसऱ्या स्थानावर ढकलले. जीटीचे ११ सामन्यांत १६ गुण आहेत.
हेही वाचा – Virat Kohli : ‘तो आमच्यासाठी चिकूच राहणार…’, विराट कोहलीच्या निवृत्तीवर इशांतची हृदयस्पर्शी प्रतिक्रिया
या ५ संघांमध्ये लढाई –
सध्या आरसीबी १७ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत आणि १६ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. याशिवाय, पंजाब किंग्ज ११ सामन्यांत १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर, मुंबई इंडियन्स १४ गुणांसह इतर संघांना कठीण स्पर्धा देत आहे. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स ११ सामन्यांत १३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.





