KKR vs SRH : ७ चौकार, ३ षटकार…वेंकटेश अय्यरने घातला धुमाकूळ; शेवटच्या ९ चेंडूत काढल्या ३१ धावा, पाहा VIDEO

KKR vs SRH Venkatesh Iyer smashed 60 runs in 29 balls : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात, केकेआरने एका खेळाडूला खरेदी करण्यासाठी २३.७५ कोटी रुपये खर्च केले. या निर्णयावर टीकाही झाली. पहिल्या तीन सामन्यात करोडपती झालेल्या या फलंदाजाची बॅटही पूर्णपणे शांत राहिली. किंमतीमुळे, सर्वजण या खेळाडूला ट्रोल करण्यात व्यस्त होते. तथापि, हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात या फलंदाजाने आपल्या फलंदाजीने सर्वांना चोख उत्तर दिले. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून वेंकटेश अय्यर आहे.
२३.७५ कोटींच्या फलंदाजाने केला मोठा धमाका –
वेंकटेश अय्यरने त्याच्या डावातील शेवटच्या ९ चेंडूत ३१ धावा केल्या आणि २०६ च्या स्ट्राईक रेटने खेळताना कहर केला. कर्णधार अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर क्रीजवर आलेल्या वेंकटेश अय्यरवर केकेआरचा धावगती वाढवण्याची जबाबदारी होती. वेंकटेशनेही त्याचे काम खूप चांगले केले. २३.७५ कोटींना विकला गेलेला वेंकटेश आला तेव्हा त्याने आपले शॉट्स मोकळेपणाने खेळले आणि हैदराबादच्या गोलंदाजांना घाम फोडला.
This duo 🥹💜🤝pic.twitter.com/GwmW8YfDkf
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 3, 2025
केकेआरच्या उपकर्णधाराने २९ चेंडूंचा सामना करत ६० धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, ७ चौकार आणि तीन उत्तुंग षटकार मारले. वेंकटेशने रिंकू सिंगसोबत पाचव्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली, ज्याच्या आधारे प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताने ६ विकेट्स गमावून २०० धावा केल्या.
शेवटच्या ९ चेंडूत कुटल्या तब्बल ३१ धावा –
4, 4, 1, 4, 6, 4, 4, 2, 1lb, 6, 4.
Venkatesh. Rajasekaran. Iyer. 🫡 pic.twitter.com/iQkdntqJbt
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 3, 2025
वेंकटेश अय्यरने फलंदाजीने, विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये, कहर केला. डावाच्या १९व्या षटकात वेंकटेशने पॅट कमिन्सची चांगलीच धुलाई केला. त्याने कमिन्सच्या षटकाची सुरुवात चौकार आणि षटकार मारून केली. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वेंकटेश चौकार मारण्यात यशस्वी झाला आणि त्याने चौथा चेंडूही सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. कमिन्सच्या या षटकात व्यंकटेशने १९ धावा काढल्या.
यानंतर वेंकटेश यांनी डावातील शेवटच्या षटकाची सुरुवात स्वतःच्या शैलीत केली आणि पहिलाच चेंडू थेट सीमारेषेवर पाठवला. त्याच वेळी, दुसऱ्या चेंडूवर व्यंकटेशने चौकार मारला. तथापि, पुढच्याच चेंडूवर, मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात व्यंकटेशने आपली विकेट्स गमावली. अशाप्रकारे व्यंकटेशने शेवटच्या ९ चेंडूत ३१ धावा काढल्या.





