DC vs KKR : फिन ॲलेनचा शतकी तडाखा अन् दिल्लीच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी; केकेआरचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय
DC vs KKR : केकेआरचा स्फोटक फलंदाज फिन ॲलेन याने झळकावलेले तुफानी शतक या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरले.

DC vs KKR Kolkata Knight Riders won : आयपीएल २०२६ मधील ५१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) त्यांच्याच घरच्या मैदानावर अक्षरश: धुव्वा उडवला. अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या एकतर्फी लढतीत केकेआरने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. केकेआरचा स्फोटक फलंदाज फिन ॲलेन याने झळकावलेले तुफानी शतक या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरले.
दिल्लीच्या फलंदाजांची शरणागती –
नाणेफेक जिंकून केकेआरने प्रथम गोलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अतिशय खराब झाली. संपूर्ण डावात दिल्लीच्या फलंदाजांनी तब्बल ५१ ‘डॉट बॉल्स’ खेळले, ज्यामुळे त्यांना २० षटकांत ८ बाद १४२ धावांपर्यंतच मजल मारता आली.
A 𝙆night of sheer dominance 🔥@KKRiders chase down the 🎯 with 34 deliveries to spare and make it 4⃣ wins on the trot 👊💜
Scorecard ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR pic.twitter.com/e3cpW0J2Xq
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
सलामीवीर पाथुम निस्सांकाने ३० चेंडूत ५० धावांची खेळी केली, तर आशुतोष शर्माने ३९ आणि केएल राहुलने २३ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाज केकेआरच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल दिसले. केकेआरकडून अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
फिन ॲलेनचा शतकी ‘फिनिंशिंग’ टच –
A 47-ball ton with the last 55 runs coming in only 16 balls 🤯
Finn Allen finishes with 100* in a successful run chase of 143 🔥🔥
Scorecard ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR | @KKRiders pic.twitter.com/6Ze0sQosQB
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
प्रत्युत्तराl १४३ धावांचे छोटे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरच्या पहिल्या दोन विकेट्स (अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी) लवकर गेल्या. यानंतर, मात्र केकेआने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसे काढली. फिन ॲलेनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक अवघ्या ४७ चेंडूत ठोकले. त्याच्या या नाबाद १०० धावांच्या खेळीत ५ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांचा समावेश होता. ॲलेनने २१२.७६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत सामना अवघ्या १४.२ षटकांत संपवला. त्याला कॅमेरून ग्रीनने २७ चेंडूत ३३ धावा करत खंबीर साथ दिली.
दिल्लीचे गोलंदाज ठरले निष्प्रभ –
SMASHED THEM INTO THE STANDS 👊🔥
🎥 Cameron Green and Finn Allen with two huge 6️⃣s against the #DC spinners 🙌
Updates ▶️ https://t.co/NaWLphmJKY#TATAIPL | #KhelBindaas | #DCvKKR | @KKRiders pic.twitter.com/K45dfen5lf
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2026
दिल्लीच्या गोलंदाजांकडे केकेआरच्या फटकेबाजीवर कोणतेही उत्तर नव्हते. अक्षर पटेलचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. या चौथ्या विजयामुळे केकेआरने गुणतालिकेत आपली स्थिती भक्कम केली आहे, तर सातव्या पराभवांमुळे दिल्ली कॅपिटल्सचा या हंगामातील प्रवास अधिक खडतर झाला आहे.





