Sunil Narine Record : १८ वर्षांच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सुनील नरेनने करून दाखवलं; आयपीएलमध्ये केला नवा महाविक्रम
Sunil Narine Record : २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण करणारा नरेन मागील १६ वर्षांपासून एकाच फ्रँचायझीशी एकनिष्ठ राहिला आहे.

Sunil Narine 200 IPL Matches Record : कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर गुजरात टायटन्सविरुद्ध (GT) मैदानावर पाऊल ठेवताच केकेआरचा (KKR) कणा मानल्या जाणाऱ्या सुनील नरेनने आयपीएलच्या इतिहासात एका सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये चक्क २०० सामने खेळणारा सुनील नरेन हा पहिला परदेशी खेळाडू ठरला आहे. २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण करणारा नरेन मागील १६ वर्षांपासून एकाच फ्रँचायझीशी एकनिष्ठ राहिला आहे.
पोलार्ड आणि डिव्हिलियर्सला टाकलं मागे –
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत सुनील नरेनने अव्वल स्थान पटकावताना मुंबई इंडियन्सचा माजी अष्टपैलू किरॉन पोलार्डला (१८९ सामने) मागे टाकले आहे. या यादीत आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स ( १८४ सामने) तिसऱ्या, डेव्हिड वॉर्नर (१८४ सामने) चौथ्या आणि ड्वेन ब्राव्हो (१६१ सामने) पाचव्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सला तीन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात नरेनचा वाटा मोठा राहिला आहे. नरेनने या २०० सामन्यांच्या प्रवासात १८२० धावा केल्या असून त्याच्या नावावर २०३ विकेट्स आहेत.
Another record for Sunil Narine in the IPL 💜#IPL2026 #KKRvGT #KKR pic.twitter.com/oTSjEFGFox
— Circle of Cricket (@circleofcricket) May 16, 2026
२०० सामन्यांपूर्वीच २०० विकेट्सचा पराक्रम –
Sunil Narine becomes the first overseas player to complete 200 appearances in the Indian T20 League 🔥
Kieron Pollard is second with 189 appearances, while AB de Villiers and David Warner are joint third with 184 each 👏#SunilNarine #KKRvsGT #KieronPollard #CricketMatlabCREX pic.twitter.com/vqpRx9pZTY
— CREX (@Crex_live) May 16, 2026
नरेनने केवळ सामन्यांचेच द्विशतक झळकावले नाही, तर आयपीएलमध्ये २०० विकेट्सचा टप्पा पार करणारा तो एकमेव परदेशी गोलंदाज आहे. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या परदेशी गोलंदाजांमध्ये तो २०३ विकेट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ ड्वेन ब्राव्हो (१८३ विकेट्स), राशिद खान (१७४ विकेट्स) आणि लसिथ मलिंगा (१७० विकेट्स) यांचा क्रमांक लागतो.
या सामन्यात केकेआरची सुरुवात खराब झाली होती. मात्र, त्यानंतर फिन ॲलन आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूंमध्ये ९५ धावांची शानदार भागीदारी केली. ॲलन ३५ चेंडूंमध्ये चार चौकार आणि १० षटकारांसह ९३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून फलंदाजीला आलेल्या कॅमेरॉन ग्रीनने रघुवंशीसोबत धावगती कायम ठेवत धावसंख्या २४७ पर्यंत नेली. अंगक्रिश रघुवंशीने ८२ धावा केल्या, तर कॅमेरुन ग्रीनने ५२ धावांची शानदार खेळी केली. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज आणि आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





