KKR vs SRH : ठीक ३६५ दिवसानंतर पुन्हा घडला ‘हा’ योगायोग, २० वर्षीय फलंदाजाने ईडन गार्डन्सवर केला खास पराक्रम

KKR vs SRH Angkrish Raghuvanshi : २० वर्षीय अंगक्रिश रघुवंशी युवा फलंदाजाने ईडन गार्डन्सच्या मैदानावर केकेआरचा लाजही राखली. १६ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर अडचणीत सापडलेल्या कोलकाताच्या डावाला या फलंदाजाने सावरलेच नाही तर त्याने शानदार अर्धशतकी खेळीही साकारली. रघुवंशीने आयपीएलमध्ये तोच पराक्रम केला, जो त्याने गेल्या वर्षी ३ एप्रिल रोजी केला होता. रघुवंशीने ३२ चेंडूंचा सामना करत ५० धावांची दमदार खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, अंगक्रिशने १५६ च्या स्ट्राईक रेटने खेळताना आणि ५ चौकार आणि २ उत्तुंग षटकार मारले.
३६५ दिवसांनंतर रघुवंशीने पुन्हा केला हा खास पराक्रम –
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. क्विंटन डी कॉकला पॅट कमिन्सने फक्त एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याच वेळी, सुनील नरेनला मोहम्मद शमीने ७ धावांवर बाद केले. १६ धावांत दोन विकेट्स गमावलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी उत्तम प्रकारे हाताळले. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेट्ससाठी ८१ धावांची भागीदारी केली. रहाणेने २७ चेंडूत एका चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या.
A 𝙆𝙣𝙞𝙜𝙝𝙩'𝙨 Fight 💪
Angkrish Raghuvanshi produces an attractive knock under pressure to bring up his 2⃣nd #TATAIPL 5⃣0⃣👏
Updates ▶ https://t.co/jahSPzcGIU#KKRvSRH | @KKRiders | @angkrish10 pic.twitter.com/zP6b5ZTBjg
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
दरम्यान, सर्व लक्ष २० वर्षीय बॅटर रघुवंशीने वेधून घेतले. अंगक्रिशने ३२ चेंडूत ५० धावांची शानदार खेळी केली. आयपीएलमध्ये केकेआरच्या या युवा फलंदाजाचे हे दुसरे अर्धशतक आहे. विशेष म्हणजे रघुवंशीने ३ एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये पहिले अर्धशतक झळकावले होते. म्हणजेच, ३६५ दिवसांनंतर, अंगक्रिशने दुसरे अर्धशतक ठोकले.
हेही वाचा – KKR vs SRH : ७ चौकार, ३ षटकार…वेंकटेश अय्यरने घातला धुमाकूळ; शेवटच्या ९ चेंडूत काढल्या ३१ धावा, पाहा VIDEO
केकेआरने त्याला लिलावात रिटेन केले होते –
आयपीएल २०२५ पूर्वी केकेआरने अंगक्रिश रघुवंशीला कायम ठेवले होते. रघुवंशीला कोलकाता नाईट रायडर्सने ३ कोटी रुपयांना रिटेन केले होते. गेल्या हंगामात या तरुण फलंदाजाने चांगली कामगिरी केली. १० सामन्यांमध्ये रघुवंशीने १५५ च्या अविश्वसनीय स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कठीण काळात अंगक्रिषच्या बॅटने गेल्या हंगामातही चांगली कामगिरी केली होती.





