KKR VS RCB : विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर RCB चा KKR वर शानदार विजय; अंगकृष रघुवंशीची खेळी व्यर्थ
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 57 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR VS RCB) यांच्यात पार पडला.

KKR VS RCB : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 57 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR VS RCB) यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत कोलकाता संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना KKR ची सुरुवात थोडीशी अडखळत (KKR VS RCB) झाली. मात्र नंतर या संघाने डाव सावरत RCB समोर 193 धावांचं आव्हान ठेवलं. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. केकेआरच्या पाचही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली.
यामध्ये अंगकृष रघुवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेडूत 71 धावांची खेळी केली. तर उपकर्णधार रिंकु सिंह याने सामन्याच्या उत्तराधार्त आक्रमक फलंदाजी करत नाबाद 49 धावा केल्या.
तर आरसीबीकडून (KKR VS RCB) गोलंदाजीमध्ये भूवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड आणि रसिक सलम दार यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. केकेआर साठी हा सामना करो या मरो असा होता.
या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीची (KKR VS RCB) सुरुवात चांगली झाली. मात्र एक चुकीचा शॉट खेळून जेकब बेथल याने आपली विकेट लवकर गमावली. मात्र दुसऱ्या बाजूने विराट कोहलीने आक्रमण सुरु ठेवले होते. त्याला देवदत्त पडिकल याची उत्तम साथ लाभली. विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर आरसीबीने केकेआरवर ६ विकेट्स नी शानदार विजय मिळवला.
या विजयासह आरसीबीचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. तर या पराभवामुळे केकेआरचे प्ले ऑफचे गणित थोडे किचकट बनले आहे. त्यांना आता दुसऱ्या संघाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागणार आहे.






