KKR vs LSG : रोमांचक सामन्यात लखनौचा कोलकातावर निसटता विजय! रिंकू सिंगची कडवी झुंज ठरली अपयशी

KKR vs LSG Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 4 runs : आयपीएल २०२५ चा २१ वा सामना खूपच रोमांचक झाला. ज्यामध्ये लखनौने शेवटच्या षटकात कोलकातावर ४ धावांनी विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात साडेचारशेहून अधिक धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना लखनौने निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर २३८ धावांचा मोठा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, कर्णधार अजिंक्य रहाणेचे अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या शानदार फलंदाजीनंतरही केकेआरला २० षटकांत फक्त २३४ धावाच करता आल्या. विशेष केकेआरला शेवटच्या षटकांत निसटता पराभव पत्करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून चाहते आयपीएल २०२५ मधील सामने एकतर्फी होत असल्याची तक्रार करत होते. पण दोन दिवसांतच दोन उच्चांकी आणि अतिशय रोमांचक सामने पाहायला मिळाले. सोमवारी ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर आरसीबी आणि एमआय यांच्यात एक उत्तम सामना पाहायला मिळाला. यानंतर आज ईडन गार्डन्सवर असेच काहीसे घडले, जिथे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चालला आणि कोलकाताने त्यांच्या हातात असलेला सामना गमावला.
Thorough entertainment at the Eden Gardens 🏟 🍿
And it's the Rishabh Pant-led @LucknowIPL that prevail in a thrilling run fest 🥳
They bag 2️⃣ crucial points with a 4️⃣-run victory over #KKR 👏
Scorecard ▶ https://t.co/3bQPKnxnJs#TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/31clVQk1dD
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
शार्दुलने रहाणेला बाद करून केकेआरला दिला मोठा धक्का –
लक्ष्याचा पाठलाग करताना, केकेआरने क्विंटन डी कॉकची विकेट लवकर गमावली, जो १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर सुनील नारायण आणि रहाणे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५०हून अधिक धावांची भागीदारी केली. मात्र, दिग्वेश राठीने नरेनला बाद करून ही भागीदारी मोडली. १३ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा काढल्यानंतर नरेन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतरही रहाणे थांबला नाही आणि त्याने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रहाणे आणि व्यंकटेश अय्यर फलंदाजी करत असताना केकेआर हे मोठे लक्ष्य गाठेल असे वाटत होते, परंतु शार्दुलने रहाणेला बाद करून केकेआरला मोठा धक्का दिला.
हेही वाचा – MI vs RCB : जितेश शर्मा आणि यश दयालने झेल सोडल्यानंतर संतापला विराट, रागाच्या भरात केलं ‘असं’, पाहा VIDEO
केकेआरला शेवटच्या षटकांत हव्या होत्या २४ धावा –
रहाणे बाद झाल्यानंतर, केकेआरचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी रमणदीप (१), अंगकृष रघुवंशी (५), वेंकटेश अय्यर (४५) आणि आंद्रे रसेल (७) यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर, केकेआरला लक्ष्य गाठणे कठीण वाटले, परंतु रिंकूने शेवटच्या षटकांमध्ये धमाकेदार कामगिरी केली. शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी २४ धावांची आवश्यकता होती, पण संघ फक्त २० धावाच करू शकला. अशाप्रकारे लखनौने हा सामना जिंकला. केकेआरकडून हर्षित राणा १० धावांवर नाबाद राहिला. लखनौकडून आकाश दीप आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन, तर आवेश खान, दिग्वेश राठी आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
हेही वाचा –MS Dhoni : एमएस धोनी फक्त ‘या’ व्यक्तीला घाबरायचा, IPL 2025 दरम्यान स्वत:च केला खुलासा
निकोलस पूरनने साकारली नाबाद ८७ धावांची खेळी –
तत्पूर्वी या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने धावांचा डोंगर उभारला. लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांनी अतिशय स्फोटक फलंदाजी केली आणि म्हणूनच लखनौने केकेआरला विजयासाठी २३९ धावांचे लक्ष्य दिले होते. एडेन मार्क्रम आणि मिशेल मार्श या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी ९९ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, एडेन मार्क्रमने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. मिचेल मार्शनेही खूप वादळी खेळी केली. त्याने फक्त ४८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. त्याचबरोबर निकोलस पूरनने फक्त २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८७ धावांची शानदार खेळी साकारली.





