MS Dhoni : एमएस धोनी फक्त ‘या’ व्यक्तीला घाबरायचा, IPL 2025 दरम्यान स्वत:च केला खुलासा

MS Dhoni was very afraid of his father as a child : टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर शांत स्वभावासाठी ओळखला जातो. अलिकडेच त्याने एका मुलाखतीत काही मोठे खुलासे केले आहेत. यावेळी त्यानी त्याचे बालपण, रांचीमध्ये घालवलेले सुरुवातीचे दिवस, वडील पान सिंग यांची शिस्त आणि त्यांच्याबद्दल वाटणारी भीती यासारख्या गोष्टींचा उल्लेख केला. धोनीने सांगितले की तो त्याच्या वडिलांना खूप घाबरत असे कारण ते खूप कडक आहेत आणि नेहमीच शिस्तबद्ध राहणे पसंत करतात.
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये, एमएस धोनीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. त्याने स्वतःबद्दलच्या काही गोष्टी देखील उघड केल्या ज्या कदाचित त्याच्या चाहत्यांना आधी माहित नसतील. त्याने त्याच्या वडिलांच्या शिस्तीच्या भावनेने त्याला एक चांगला माणूस बनण्यास कशी मदत केली हे स्पष्ट केले. पॉडकास्ट दरम्यान त्यानी रांचीमध्ये घालवलेल्या बालपणीच्या दिवसांची आठवणीही सांगितल्या.
धोनीने त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा –
वडिलांसोबतच्या नात्याबद्दल धोनीने सांगितले की, तो त्याच्या वडिलांना खूप घाबरत होता. कारण ते खूप कडक आहेच. ते खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहेत. हेच कारण आहे की तो खूप शिस्तप्रिय आहे. धोनीचे वडील त्याला मारहाण करायचे असे काही नाही, तर देखील धोनीला त्यांची भीती वाटायची. त्याच्या बालपणीची आठवण करून देताना धोनी म्हणाला की, त्याचे मित्र कॉलनीच्या भिंतीवर चढायचे पण त्याला कधीच असे करण्याचे धाडस झाले नाही. जर त्याच्या वडिलांनी त्याला असे करताना पाहिले तर त्याचे परिणाम काय होतील, हे त्याला माहित नव्हते आणि म्हणूनच तो त्यांना खूप घाबरत होता.
हेही वाचा – KKR vs LSG : निकोलस पूरनचा कहर! वीरेंद्र सेहवागला मागे टाकत आयपीएलमध्ये केला खास पराक्रम
पॉडकास्ट दरम्यान माहीने असेही सांगितले की, त्याचे बालपण खूप शिस्तबद्ध होते. त्याची शाळा कॉलनीतच होती, त्यामुळे त्या काळात तो कोणत्याही करामती करू शकत नव्हता. त्याच्या शिक्षकाने त्याच्या मोठ्या भावालाही शिकवले होते. धोनी आणि त्याच्या भावाच्या वयात १० वर्षांचे अंतर होते. त्यामुळे सर्व शिक्षक त्याच्या संपूर्ण कुटुंबाला चांगले ओळखत होते.





